अल्पवयीन पत्नी, बाळाचा जन्म अन् आधार कार्डाने उघड केला प्रकार; पतीविरुद्ध POCSOचा गुन्हा

अपनी भाषा में पढ़े! Translate

अल्पवयीन पत्नी, बाळाचा जन्म अन् आधार कार्डाने उघड केला प्रकार; पतीविरुद्ध POCSOचा गुन्हा

 

अमळनेर : विक्की जाधव.crcrcrcc

तालुक्यातील लडगाव येथे अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी पतीविरुद्ध POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनूर कापडणे येथील १५ वर्षे ६ महिन्यांच्या मुलीचा सुमारे वर्षभरापूर्वी लडगाव येथील अजय कैलास अहिरे याच्याशी विवाह झाल्याची माहिती आहे. विवाहानंतर गर्भवती झाल्यानंतर ती आई-वडिलांकडे आली होती.

दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी प्रसूतीच्या वेदना होत असल्याने तिला धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिने एका मुलीला जन्म दिला. वैद्यकीय प्रक्रियेत तिच्या आधार कार्डावरील जन्मतारीख तपासण्यात आली असता ती अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून अजय कैलास अहिरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६५(१) तसेच POCSO कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!