अमळनेरसह जिल्ह्यातील अनुदानित शाळांवर लक्ष; गुन्हे दाखल कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत शिक्षण विभाग ॲक्शन मोडमध्ये..

अपनी भाषा में पढ़े! Translate

images (2)

अमळनेरसह जिल्ह्यातील अनुदानित शाळांवर लक्ष; गुन्हे दाखल कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत शिक्षण विभाग ॲक्शन मोडमध्ये..

 

अमळनेर : विक्की जाधव.

जळगाव जिल्ह्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविरोधात दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आता वेतनाबाबत कडक भूमिका घेतली आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाने १८ ऑगस्ट रोजी आदेश काढून, संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यापूर्वी गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांची वस्तुनिष्ठ खात्री करण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे अमळनेरसह संपूर्ण जिल्ह्यातील अनुदानित शाळांमध्ये या आदेशाची चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणाऱ्या २० ऑगस्टच्या पत्रात नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. २१६/२०२६ संदर्भात जळगाव जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. संबंधित संस्थांनी सन २०२० पासून आजपर्यंत तपासणी झालेल्या बिंदू नामावलीची तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता यादीची माहिती सादर करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. ही माहिती तातडीने वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यासाठी मुदतही निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, एखाद्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल असल्यास केवळ आरोपाच्या आधारावर वेतन रोखण्याऐवजी संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, न्यायालयीन आदेश आणि नियुक्ती प्राधिकाऱ्याचे निर्देश तपासून पुढील कार्यवाही करण्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. नियमबाह्य पद्धतीने वेतन अदा झाल्यास संबंधित मुख्याध्यापक व आहरण-संवितरण अधिकारी जबाबदार राहतील, अशी नोंदही आदेशात करण्यात आली आहे. त्यामुळे अमळनेरसह जळगाव जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांच्या पातळीवर आता कागदपत्रांची छाननी आणि नोंदवही तपासणीला वेग येण्याची शक्यता आहे.

सोर्स मार्मिक – पत्रकार विक्की जाधव. 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!