“युवा वर्गाला रोटरीच्या माध्यमातून मार्गदर्शनाची गरज” – खासदार ॲड. उज्ज्वल निकम
अमळनेर : विक्की जाधव.
रोटरी क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण समारंभ नर्मदा रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यासाठी पद्मश्री मान. खासदार ॲड. उज्ज्वल निकम साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असिस्टंट गव्हर्नर रोटे. ॲड. रुपेश पाटील व रोटे. गनी मेमन, जळगाव यांचीही विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी परिवारातील सदस्य व साने गुरुजी स्मारकाचे संस्थापक माजी प्राचार्य अरविंद सराफ सर यांच्यासह सर्व दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा बुके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष रोटे. देवेंद्र कोठारी यांनी गतवर्षाच्या कार्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर त्यांनी नूतन अध्यक्ष रोटे. महेश पाटील यांना कॉलर, रोटरी चार्टर व हॅमर प्रदान करून पदभार सोपविला. मावळते सचिव रोटे. आशिष चौधरी यांनी रोटे. प्रशांत निकम यांच्याकडे सचिव पदाचा पदभार सोपविला. नूतन अध्यक्ष रोटे. महेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
असिस्टंट गव्हर्नर ॲड. रुपेश पाटील यांनी RI डिस्ट्रिक्ट 3030 चे गव्हर्नर डॉ. राजेश पाटील यांचा संदेश वाचून दाखविला.
प्रमुख पाहुणे मान. खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या शुभहस्ते रोटे. मकसूद बोहरी यांनी संपादित केलेल्या “सेवाचक्र” रोटरी बुलेटीनचे विमोचन करण्यात आले. यानंतर RI डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये रोटरी इन्क्लेव्ह म्हणून रोटे. कीर्तीकुमार कोठारी यांची सेक्रेटरी म्हणून तर रोटे. प्रीतपाल सिंग बग्गा यांची जॉईंट सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली. या दोघांचाही सत्कार प्रमुख पाहुणे मान. खासदार ॲड. उज्ज्वल निकम साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना खासदार ॲड. उज्ज्वल निकम म्हणाले की, “समाजाचे आपण काही देणे लागतो अशी सामाजिक बांधिलकी जपत रोटरीचे काम जगभर सुरू असते ही समाधानाची बाब आहे. रोटरी रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यांसारखी सेवा करते. त्यासोबतच आजचा युवा वर्ग भरकटलेला दिसतो. त्यांना रोटरीच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन व समुपदेशनाची आवश्यकता आहे व ते काम रोटरीने हाती घ्यावे असे त्यांनी सुचविले.
रोटे. गनी मेमन यांनी वृद्धाश्रमांची वाढती संख्या आणि त्यासाठी 3 ते 5 वर्षांची प्रतीक्षा यादी सुरू झाली आहे याबत चिंता व्यक्त केली. “मुलांनी आई-वडिलांची जबाबदारी घेणे ही काळाची गरज आहे” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे. अजय रोडगे, रोटे. प्रतीक जैन आणि रोटरी एनी. आरती रेजा यांनी केले. आभार प्रदर्शन रोटे. प्रशांत निकम यांनी केले. पसायदान रोटरी एनी. पूर्वा वशिष्ठ यांनी सादर केले.
या प्रसंगी. सौ ज्योती निकम, धरणगाव, पारोळा, चोपडा येथील रोटरी पदाधिकारी, लायन्स क्लब, अमळनेर वकील संघ, अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, श्री मंगलग्रह मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले, खाशी मंडळाच्या च्या माधुरीताई पाटील, नीरज अग्रवाल, मनोहर निकम, एडवोकेट विलास वाणी, एडवोकेट मनोहर पवार, एडवोकेट तीलोत्तमा पाटील, सौ भारती सोनवणे शहरातील मान्यवर, व्यापारी, रोटरी परिवार व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी बातमी रोटे मकसूद बोहरी कळवितात.