अमळनेरच्या पाणीपुरवठ्यात नेमकं घडतंय काय? टेंडरपासून ठेकेदारापर्यंतचा लेखाजो” खा.. मार्मिकच्या रडारवर!
गेल्या अनेक दिवसांपासून अमळनेर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले.
मात्र, या प्रश्नावर नगरपालिका प्रशासन, पदाधिकारी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, माननीय. आमदार, माजी आमदार तसेच सत्ताधारी अन, विरोधी नगरसेवकांकडून वेगवेगळी कारणे पुढे केली जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
खरे कारण नेमके काय? जबाबदारी कोणाची? आणि पाणीपुरवठ्याच्या टेंडरपासून प्रत्यक्ष ठेकेदारापर्यंत नेमका काय कारभार झाला? सर्वांची ठरलेली टक्केवारी या सर्व प्रश्नांचा आता सविस्तर मागोवा घेण्याची वेळ आली आहे.
पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या घोषणा अनेक, पण नळाला पाणी मात्र अनियमित! त्यामुळे केवळ आरोप-प्रत्यारोपांपेक्षा कागदोपत्री प्रक्रिया, टेंडरच्या अटी, ठेकेदाराची जबाबदारी, प्रत्यक्ष काम आणि कामाची अंमलबजावणी प्रशासनाची भूमिका यांचा वस्तुनिष्ठ तपास होणे गरजेचे आहे.
या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाच्या मुद्द्यांसह ‘मार्मिक’ खुलासा लवकरच… नागरिकांच्या पैशांचा आणि पाण्याचा हिशेब नेमका कुठे अडकला, याचा शोध आता घेतला जाणार आहे.
वाचा सविस्तर बातमी लवकरच..
पत्रकार विक्की जाधव.