December 10, 2025 4:39 am

प्रभाग क्रमांक 1 मध्ये कैलास नामदेव पाटील यांचा विजय अटळ! 

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग क्रमांक 1 मध्ये कैलास नामदेव पाटील यांचा विजय अटळ! 

 

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 1 हा सध्या शहरातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रभागात एकच नाद घुमू लागला आहे  “कैलास पाटील जिंकणारच!” गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये सातत्याने राहत केलेला जनसंपर्क, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी केलेली धडपड आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता दिलेली मदत या सर्व कार्यामुळे कैलास नामदेव पाटील यांची प्रतिमा ‘विश्वासू आणि प्रामाणिक नेतृत्व’ अशी निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 मधून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

प्रचारादरम्यान घराघरातून मिळणारा प्रतिसाद बघता विरोधकांचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि तरुणाईपासून ते व्यवसायिकांपर्यंत सर्व घटकांकडून कैलास पाटील यांना मिळणारा खुला पाठिंबा पाहून प्रभागात एकतर्फी वातावरण तयार झाले आहे. “काम करणारा नेता हवा, फक्त बोलणारा नाही” अशी भूमिका लोक स्पष्टपणे व्यक्त करत आहेत. प्रभागातील विकासाच्या अपूर्ण कामांवर नाराज झालेल्या मतदारांना आता वास्तविक बदल हवा असून, तो बदल करण्याची क्षमता केवळ कैलास पाटील यांच्यात असल्याचा विश्वास जनतेत बळावला आहे.

सध्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये अशी लाट तयार झाली आहे जी निकालापूर्वीच निकाल सांगून जातेय. “कैलास पाटील यांचा विजय शंभर टक्के!” असा आत्मविश्वास नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत. त्यांच्यावरील जनता आशीर्वाद, केलेलं काम आणि सातत्याने जपलेला लोकसंपर्क यामुळे प्रभागात विकासाच्या नवीन पर्वाची सुरुवात होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक 1 चा कणा मजबूत होणार आणि नेतृत्व म्हणून कैलास नामदेव पाटील यांचं नाव ठामपणे झळकणार, याबाबत मतदारांमध्ये कोणतीही दुमत नाही.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!