भिगवण व परिसरात गुटखा विक्री पडद्याआडून सुरूच; कठोर अंमलबजावणीची गरज

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण व परिसरात गुटखा विक्री पडद्याआडून सुरूच; कठोर अंमलबजावणीची गरज

(निलेश गायकवाड)

भिगवण (ता. इंदापूर):महाराष्ट्रात गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतुकीवर बंदी असतानाही भिगवण व परिसरात पडद्याआडून राजरोसपणे गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून प्रशासनाने कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे.

भिगवण शहरासह, मदनवाडी, तक्रारवाडी,बाजार तळ आणि पानटपरी, किराणा दुकानांमध्ये छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री होत आहे. काही ठिकाणी दुप्पट दराने गुटखा विकला जात आहे. शाळा, महाविद्यालय परिसरातही सहज गुटखा मिळत असल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

गुटख्यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होतात, हे माहीत असूनही केवळ आर्थिक फायद्यासाठी काही दुकानदार जीवाशी खेळ करत आहेत. यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाने कारवाया केल्या होत्या, मात्र कारवाईनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते.

याबाबत नागरिकांनी बोलताना सांगितले की, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संयुक्तपणे धाडसत्र राबवून अशा विक्रेत्यांवर कठोर गुन्हे दाखल करावेत. केवळ किरकोळ दंड न करता परवाना रद्द करण्यासारखी कठोर कारवाई झाल्यासच गुटखा विक्रीला आळा बसेल.

प्रशासनाने लक्ष घालावे अशी नागरिकांची मागणी आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!