प्रभाग क्र. 14 मध्ये राजकारणाला लागली नवी ठिणगी!
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 14 मध्ये यंदा तरुणाईचा जोश आणि बदलाचा आवाज दोन्ही एकाच वेळी दिसत आहे. सामान्य घरातील, सुशिक्षित आणि धडाडीची सौ. ज्योती पंकज शेटे ह्या सर्वांत तरुण उमेदवार म्हणून मैदानात उतरल्याने प्रचारां दरम्यान त्यांना सामान्य जनता मतदार तरुण तरुणी वृद्ध अनेकांचे मतदान रुपी आशीर्वाद मिळत असून त्यांच्या उमेदवारीने प्रभागात महिला सशक्तिकरण होईल अशी अपेक्षा बाळगली जातं आहे.या प्रभागात प्रस्थापितांमध्ये खळबळ माजली असून कमी वयात लोकसेवेचं धैर्य दाखवणारी ही तरुणी प्रभागात जनतेच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरू लागली आहे.
या प्रभागात विविध समाज, विविध प्रश्न आणि अनेक वर्षांपासून रखडलेली कामे असल्याने आता नव्या विचारांची, सुशिक्षित नेतृत्वाची गरज भासत आहे. जुन्या पद्धतींच्या मरगळलेल्या कामकाजापेक्षा ताज्या दृष्टिकोनाला मतदार प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळेच हा लढा “प्रस्थापित विरुद्ध नव्या बदलाचा” अशी सरळ रेष तयार झाली असून ज्योतीताईंच्या धडाडीपुढे पारंपरिक गोट्यांना तग धरणं कठीण जात आहे.