सौ. भावना कैलास विसपुते यांना प्रभाग क्र. १७ (अ) मधून उमेदवारी निश्चित होताच प्रभागातील मतदारांमध्ये आनंदोत्सव

अपनी भाषा में पढ़े! Translate

सौ. भावना कैलास विसपुते यांना प्रभाग क्र. १७ (अ) मधून उमेदवारी निश्चित होताच प्रभागातील मतदारांमध्ये आनंदोत्सव 

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १७ (अ) हा महिलांसाठी राखीव असलेला महत्त्वाचा प्रभाग असून, गेल्या अनेक वर्षापासून जणू मीच या प्रभागाचा नगरसेवक असे वल्गना करणारें अखेर महिलां राखीव झाल्याने थंडावले या प्रभागातून सौ. भावना कैलास विसपुते यांनी उमेदवारी जाहीर केली असून त्यांना परिसरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक राजकीय परिस्थिती पाहता काहींना असे वाटत होते जाणू मी बिनविरोध अमळनेर नगर परिषदेवर नगरसेवक म्हणून निवडून येईल आणि परिसरातील काहींना यांनी आश्वासन ही दिले. परंतु भावना ताईंनी उमेदवारी जाहीर केल्यापासून परिसरात नव्या उत्साहाची लाट उसळली आहे. साधी-सरळ व संयमी स्वभावाची भावना ताई अनेक वर्षे कैलास भाऊच्या माध्यमातून सामाजिक कार्यातून लोकांशी निगडित राहिल्या असून, प्रभागातील महिलांच्या समस्या, शिक्षण, नागरिकांच्या मूलभूत सुविधा या प्रश्नांवर त्यांची भक्कम पकड असल्यामुळे परिसरात त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे.

भावना विसपुते यांनी प्रचाराच्या पहिल्याच दिवशी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांचे दुरुस्तीकरण आणि सुरक्षित महिलासुरक्षा यांसारखे प्रश्न सोडवण्यास त्यानी प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या प्रचारादरम्यान वृद्ध महिला, तरुण तरुणी आणि युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, “आपल्या प्रभागासाठी नवी दिशा” हे त्यांचे घोषवाक्य लोकांमध्ये चांगलेच रुजत आहे.

सध्याच्या घडीला प्रभाग १७ (अ) मध्ये भावना ताईंच्या प्रचारसभांना वाढत्या प्रतिसादामुळे वातावरण रंगतदार होताना दिसत आहे.

प्रामाणिकपणा, लोकसंग्रह आणि काम करण्याची तयारी ही त्यांची मुख्य ताकद मानली जात आहे. निवडून आल्यास “सर्वांगीण विकास” हे एकमेव ध्येय ठेवून काम करण्याचा त्यांचा निर्धार स्पष्टपणे जाणवतो. त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक चर्चा सुरू असून, या निवडणुकीत भावना विसपुते यांची ताकद निश्चितच वाढत चालल्याचे जाणवत आहे.

प्रभाग 17 पुढे सविस्तर ते ही मार्मिक

पत्रकार : विक्की जाधव. 91750 50300

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!