अमळनेर चा पहिला नगरसेवक बिनविरोध..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर चा पहिला नगरसेवक बिनविरोध

 

निवडणुकीचा ‘ट्विस्ट’! वाद, चौकशी, नाट्यमय घडामोडींनंतर बुरा भाऊ बिनविरोध!

अमळनेर : विक्की जाधव.

नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 8 अ हे आज सर्वाधिक चर्चेचे केंद्र! बनले आहे. 4 दिवसापूर्वी बुरा भाऊंचं फॉर्म भरण्याच्या वेळी पोलीस चौकशीचा खळबळजनक वाद निर्माण झाला होता. क्षणाक्षणाला रंग बदलणाऱ्या या नाट्यमय प्रसंगात पोलिसांनी भुरा भाऊंची विचारपूस केली आणि तत्काळ सोडूनही दिलं. या घटनेमुळे प्रभागात सहानुभूतीची जबरदस्त लाट उसळली. जनतेला वाटलं “कार्यकर्त्यांच्या मनातील नेता घाबरत नाही, उभा राहतो!”

दरम्यान, त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यालाच एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. तर उरलेल्या उमेदवारांनीही मोठा धमाका करत आपले अर्ज माघारी घेतले. आणि इथंच घडली इतिहासात नोंद होणारी घटना  सचिन बळवंत पाटील (बुरा भाऊ) यांना परिसरातील सर्वांनी एकमताने बिनविरोध विजयी ठरवत अमळनेर मध्ये अनोखा विक्रम केला! संघर्षातून उभा राहिलेला हा विजय आता शहरभर चर्चेचा विषय ठरला असून बुरा भाऊंच्या नेतृत्वावर जनतेचा शिक्का मोर्तब झाल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे.

कूज:बुज 

यावेळी एकाने बोलून दाखवले की जैसी करणी वैसी भरणी

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!