प्रभाग 1-ब : अण्णा मेजर यांच्या उमेदवारीने नवचैतन्याची चाहूल
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1-ब मध्ये खऱ्या अर्थाने नवीन राजकीय ऊर्जा निर्माण झाली आहे. राजेंद्र शाम यादव (अण्णा मेजर) यांच्या उमेदवारीनंतर प्रभागात चर्चा, उत्सुकता आणि अपेक्षांचे उच्चांकी वातावरण तयार झाले आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या प्रभागाच्या समस्या
विशेषतः रामवाडीपासून विप्रोपर्यंतचा महत्त्वपूर्ण रस्ता हा वर्षानुवर्षे राजकारणाचा विषय राहिला, पण काम काहीच झाले नाही. नागरिकांचा आवाज न ऐकण्याऱ्या प्रवृत्तीमुळे जनतेत असंतोष वाढला होता.
अशा परिस्थितीत अण्णा मेजर यांनी मैदानात उतरून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आवाज देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. प्रभागातील लहान–थोर, व्यापारी, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त आणि जाहीर पाठिंबा पाहता, या उमेदवारीने प्रभाग 1-ब च्या राजकारणाला नवचैतन्य मिळाले असल्याचे लक्षात येते. नागरिकांच्या मनात एकच भावना “हा नेता आम्हाला नक्की न्याय देईल!”
देशसेवेनंतर आता समाजसेवेची भावना घेऊन राजकारणात उतरलेल्या अण्णा मेजर यांनी “एकनिष्ठ, एकभावनेने सर्वसामान्यांना सोबत घेऊन प्रभागाचा विकास” हे ध्येय समोर ठेवले आहे. तरुणांमध्ये तर प्रचंड उत्साह असून, सोशल मीडियापासून गल्लीबोळांपर्यंत एकच गजर “अण्णा मेजर फिक्स नगरसेवक!” त्यांच्या उमेदवारीने प्रभागात विकासाच्या चर्चांना उधाण आले असून आगामी निवडणुकीत प्रभाग 1-ब हा सर्वाधिक चर्चा होणारा प्रभाग ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.