अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग 15 मध्ये नवा राजकीय समीकरणाचा उद
अमळनेर विक्की जाधव
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत. कोण कुठून बाजी मारेल याचा प्रवाह अजूनही अनिश्चित असताना, प्रभागातील समीकरणे वेगाने बदलत आहेत. यामध्ये महत्त्वाचा टप्पा म्हणजे पुरुष प्रवर्गातून उमेदवारी दाखल केलेले संजू ठेकेदार यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेत, प्रशांत निकम यांना अधिकृत पाठिंबा जाहीर करणे. या निर्णयामुळे प्रभागातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.
त्याचबरोबर महिला प्रवर्गासाठी संजू ठेकेदार यांच्या पत्नींची सौ. उमेदवारी निश्चित झाली असून, त्यांना स्वतः संजू ठेकेदार यांचा प्रभागात मोठा जनसंपर्क असून विविध माध्यमानी त्यांना दृढ पाठिंबा दिला आहे. दोन्ही प्रवर्गांतून मिळणारा हा अनोखा पाठिंबा प्रभागातील मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ठरत आहे. एकीकडे अनुभवी नेतृत्व आणि दुसरीकडे सशक्त महिला प्रतिनिधित्व या दुहेरी ताकदीमुळे प्रभागाच्या राजकारणात नवे सत्ताकेंद्र उदयास येत असल्याचे संकेत दिसत आहेत.
कदम यांनी केलेले प्रभागात दुहेरी राजकारण, आणि समाजा-समाजात पडद्या मागे राहून तेढ निर्माण केल्याने त्यांचं विरोधात प्रभागाचे वातावरण असून सह्या-जी-राव ला मोठा विरोध आहे. तर महिला उमेदवारीसाठी कोणत्या थराचे राजकारण 15 नंबर मध्ये झाला हे सांगणे उचित ठरेल.
सोशल, विकासाभिमुख दृष्टीकोन, आणि प्रभागातील समस्यांवर तातडीने काम करण्याची वृत्ती यामुळे प्रशांत निकम व संजू ठेकेदार यांना नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. विविध समाजघटक, व्यापारी वर्ग, तरुण मतदार आणि महिला मतदारांमध्ये या दोन्ही उमेदवारांविषयी सकारात्मक लाट निर्माण होताना दिसत आहे. आगामी निवडणुकीत प्रभाग 15 सर्वाधिक रंगत आणणारा ठरणार असून, मतदार कोणत्या दिशेला कल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.