प्रभाग क्रमांक 3 मध्ये खऱ्या उमेदवाराची होतेय प्रचिती ‘बोले तैसा चाले आमचा किरण भाऊ बहारे 

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग क्रमांक 3 मध्ये खऱ्या उमेदवाराची होतेय प्रचिती ‘बोले तैसा चाले आमचा किरण भाऊ बहारे 

नगरपरिषद नगरपंचायतींचे वारे सध्या जोर धरू लागले असून अनेक उमेदवारांना निवडीची घाई लागली असून मीच जणू समाजसेवक असे प्रचिती.. अमळनेरकरांनी नुकतीच बघितली.

सिंधी कॅम्प परिसरात काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत स्थानिक तरुण, नागरिक आणि प्रशासन यांनी मिळून प्रचंड श्रम घेत आग नियंत्रणात आणली. मात्र या प्रसंगात काही लोकप्रतिनिधींनी मदतीपेक्षा फोटोसेशनलाच अधिक महत्त्व दिल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर ‘आम्हीच जणू आग विझवली’ असा खोटा प्रचार करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा केलेला प्रयत्न जनतेच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे. गेल्या पाच वर्षात कधीही या परिसरात न फिरलेले अर्ध्या रात्री जनतेच्या सांत्वन करण्यासाठी येतात म्हणजे काहीतरी नवीन अपेक्षा आहेचं.

असो तरी लोकप्रतिनिधींचे खरे कर्तव्य म्हणजे संकटात साथ देणे, सांत्वन करणे आणि समस्येचे निराकरण करणे. पण फोटो काढून प्रसिद्धी मिळवणे हेच काम समजणाऱ्यांना प्रभाग क्र. 3 चीं जनता मतदानाच्या माध्यमातून नक्कीच धडा शिकवेल, याबाबत कोणतीही शंका नाही. याउलट प्रभाग ३ ची खरी पसंती: कृष्ण रामसिंग बहारे (किरण भाऊ बहारे) यांना मिळत असून यां प्रभागात  लहान–थोर, महिला–पुरुष सर्वच स्तरातील नागरिकांकडून किरण भाऊ बहारे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः सिंधी समाजातून त्यांना मिळणारा एकमुखी पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे. जनतेशी जवळीक सरळ, स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका विकासासाठी सातत्याची वचनबद्धता यामुळे प्रभागातील मतदार किरण भाऊंना खऱ्या अर्थाने योग्य उमेदवार म्हणून पुढे नेत आहेत.

सदर बातमी ही जाहिरात नसून विविध माध्यमांचा आधार घेऊन मार्मिक प्रसिद्ध करत असते

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!