कैलास तात्या पाटील यांच्या समर्थनार्थ असंख्य कार्यकर्ते  अन्यायाविरोधात करणार बंड

अपनी भाषा में पढ़े! Translate

कैलास तात्या पाटील यांच्या समर्थनार्थ असंख्य कार्यकर्ते  अन्यायाविरोधात करणार बंड

 

अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभागात एक नवा राजकीय भूचाल पाहायला मिळत आहे. दीर्घकाळ पक्षनिष्ठा जपून काम करणारे कैलास नामदेव पाटील यांना अन्यायकारक पद्धतीने बाजूला सारल्याने कार्यकर्त्यांत तीव्र संताप उसळला आहे. “हे नेत्याचे नव्हे, हे कार्यकर्त्यांचे इलेक्शन आहे” असे म्हणत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अपक्षाची वाट धरत कैलास पाटील यांच्या समर्थनार्थ एकत्र येण्यास सुरुवात केली आहे.

पक्षश्रेष्ठींनीच घात केला, हा विश्वासघात आम्ही शांत बसून पाहणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी जाहीर सभा, बैठकांमध्ये खुलेपणाने घेतली आहे. अनेक वर्षे प्रामाणिकपणे प्रभागासाठी काम करणाऱ्या कैलास पाटील यांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे नैतिक कर्तव्य असल्याचे मतदार देखील व्यक्त करत आहेत. परिणामी, ‘एकला चलो’ ची भावना आता मोठ्या चळवळीत परिवर्तित झाली असल्याचे चित्र स्पष्ट दिसते.

अपक्षाच्या मार्गावर चालणारे कार्यकर्ते आणि नागरिक यांचा उत्साह इतका मोठा आहे की याची राजकीय आघाड्यांना कमालीची धास्ती बसली आहे. यात कैलास तात्यासाहेब पाटील यांच्या नेत्रृत्वावर असलेला विश्वास आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात पेटलेला रोष यांच्या जोरावर या निवडणुकीत अपक्षाची कडवी लढत पाहायला मिळणार यात संशय नाही. प्रभागातील नागरिकांच्या मनात आता एकच हवा आहे. “न्यायासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू… आणि अन्यायाला योग्य उत्तर देऊ.”

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!