प्रभाग 12-ब मध्ये बदलाची पहाट सुदाम शिंगाणे (आबा भोई) मैदानात!
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ला वेग येत असताना प्रभाग क्रमांक 12-ब मध्ये खऱ्या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. विकासाच्या ठोस दृष्टीकोनासह आणि जनसेवेची सातत्यपूर्ण ओळख जपत सुदाम जगन्नाथ शिंगाणे (आबा भोई) यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारीची आपली मजबूत इच्छा व्यक्त करत प्रभागातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांपासून ते मूलभूत सुविधांपर्यंत प्रत्येक स्तरावर काम करणाऱ्या या युवा नेतृत्वाच्या उमेदवारीमुळे प्रभागात नवीन उर्जा निर्माण झाली आहे. प्रभाग 12-ब च्या रस्ते, पाणी, लाईट, गटार व्यवस्था, स्वच्छता आणि शैक्षणिक गरजांसाठी आबा भोई यांनी आधीच अनेक वेळा आवाज उठवला असून, त्यांच्या मैदानात उतरण्याने प्रभागात ‘खऱ्या लोकप्रतिनिधी’ची आशा पुन्हा जागी झाली आहे.
स्थानिक तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, ही उमेदवारी प्रभागातील राजकीय वातावरणात चांगलाच बदल घडवणार असल्याचे स्पष्ट होत आहे. काही राजकारण्यांनी फोटोसेशनवर भर देत खोटा गाजावाजा करणाऱ्या वातावरणात, लोकांशी प्रत्यक्ष जमिनीवर जोडलेले असलेले आबा भोई हे प्रभागातील बहुसंख्य जनतेची पसंती ठरत असल्याचे चित्र आहे.
सदर लेख ही जाहिरात नसून विविध सामाजिक माध्यमांचा आधार घेऊन केलेली प्रसिद्ध आहे