प्रभाग 15 मध्ये प्रशांत निकम यांच्या उमेदवारीने नवचैतन्याची ला
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 15 मधून प्रशांत मनोहर निकम यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होताच प्रभागात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. उच्च शिक्षण, औद्योगिक अनुभव आणि सामाजिक बांधिलकी असलेले प्रशांत निकम यांनी प्रभागातील मुलभूत सुविधा, तरुणांचे प्रश्न आणि महिला सुरक्षेवर ठोस भूमिका मांडल्याने मतदारांमध्ये विश्वासाची भावना निर्माण झाली आहे.
प्रशांत निकम यांच्या प्रचाराला विविध माध्यमांमधून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद विशेष ठरत आहे. तसेच प्रत्यक्ष भेटीदरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेला जाहीर पाठिंबा त्यांच्यात सशक्त ऊर्जा निर्माण करतो आहे. घराघरातून मिळणारा प्रतिसाद, तरुणांचे सक्रिय योगदान आणि नागरिकांचा सहभाग पाहता प्रभागात खऱ्या अर्थाने नवचैतन्याची हवा निर्माण झाली आहे. मतदारांचे प्रश्न समजून घेत त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रशांत निकम यांनी दिलेले आश्वासन आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा दृढ निश्चय यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे आशेने पाहिले जात आहे. विकासाभिमुख दृष्टीकोन, पारदर्शक कार्यपद्धती आणि सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती यामुळे प्रशांत निकम हे प्रभाग 15 मध्ये एक मजबूत पर्याय म्हणून उदयास येत आहेत.
सदर बातमी जाहिरात म्हणून नव्हे, तर विविध माध्यमाचा कौल घेऊन प्रसिद्ध करण्यात आली आहे.