शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांचा प्रभाग 4 मधून विजयी प्रचाराला दमदार प्रारंभ!

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांचा प्रभाग 4 मधून विजयी प्रचाराला दमदार प्रारंभ!

 

अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून आपल्या विजयी प्रचाराची जोरदार सुरुवात केली. प्रभागात पाऊल ठेवताच नागरिकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त स्वागतामुळे वातावरण चैतन्यमय झाले. या कार्यक्रमाला प्रभागातील इच्छुक नगरसेवक नावेद शेख, नीता नरेश कांबळे, नरेंद्र कांबळे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवातीपासूनच उमेदवाराभोवती उमटलेली गर्दी आगामी निवडणुकीच्या समीकरणांची दिशा दाखवणारी होती.

प्रचारादरम्यान अमळनेर शहरातील जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी डॉ. बाविस्कर स्वतः घराघरांत पोहोचले. सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी “जनतेचा नेता” म्हणून विश्वास कमावण्यास पहिल्याच दिवशी सुरुवात केली. डॉक्टर या नात्याने समाजासाठी केलेल्या सेवेला नागरिकांनीही उदंड प्रतिसाद देत प्रशंसा केली. प्रभागात नवचैतन्याची हवा निर्माण झाली असून बदल आणि विकासाचे वारे वाहू लागल्याचे चित्र दिसले. सामान्य कुटुंबातील असूनही उच्च शिक्षण घेतलेला तल्लख नेता  अशी प्रतिमा असलेले डॉ. परीक्षित बाविस्कर हे प्रभाग 4 तसेच शहरातील मतदारांच्या अपेक्षांचे केंद्रबिंदू ठरत आहेत. अनेकांनी त्यांना भेटून विजयासाठी आशीर्वाद दिला, तर काहींनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची आशा व्यक्त केली. शिंदे गटासाठी हा प्रचारप्रारंभ महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, डॉ. बाविस्कर यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत नवे समीकरण घडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!