प्रभाग 13-ब : ‘प्रतिज्ञापत्र घेऊन शास्वती देणारा उमेदवार’ सुनील महाजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 13-ब : ‘प्रतिज्ञापत्र घेऊन शास्वती देणारा उमेदवार’ सुनील महाजन

 

राजकारणात पहिल्यांदाच जनतेसमोर ठेवले स्वच्छतेचे सत्य दस्तऐवज!

 

प्रभाग क्रमांक 13-ब मध्ये निवडणूक म्हणजे या वेळी फक्त पोस्टर–बॅनरची अन समाजाची लढाई नाही… तर चरित्र विरुद्ध चलाखीची थेट टक्कर! कारण अपक्ष उमेदवार सुनील दयाराम महाजन यांनी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मांडलेले प्रतिज्ञापत्र जाहीरनामा 13 नं प्रभागात अक्षरशः वादळा सारखी व्हायरल होतेय. अनेक नेते प्रचंड आश्वासने देतात, पण सुनील महाजन यांनी तर थेट जवाबदारीच जनतेच्या हातात दिली आहे.

“मी चुकलो तर पदाचा राजीनामा तयार!”

अशी निर्भीड घोषणा सध्या जनतेच्या चर्चेत केंद्रस्थानी आहे. यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुनील महाजन ना स्वतः ठेका घेणार… ना कुटुंबाला देणार… ना निकटच्या लोकांना फायदे करून देणार! राजकारण म्हणजे ‘ठेका तडजोड’ आणि दलाली असे समजणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हा खुला चपराक! पुढे, नगरपालिकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणण्याची, पैशांच्या अपहाराला अडथळा ठरण्याची आणि जनतेच्या दबाव गटासह अमळनेरला स्वच्छ–सुंदर बनवण्याची त्यांनी घेतलेली प्रतिज्ञा 13 नं प्रभागात नवीन राजकीय संस्कृतीची घोषणा ठरतेय. महाजन यांची भाषा राजकीय नाही… ती थेट जनतेच्या मनातली आहे. सुनील महाजन यांचा हा जाहीरनामा म्हणजे कागदावरचे शब्द नाहीत ते जनतेशी केलेले, स्वतः च्या स्वाक्षरीत वचन आहे. “योग्य निस्वार्थी उमेदवार पुढे आला तर पुढील निवडणूक मी लढवणार नाही” अशी वचनबद्धता कोणी आजवर दिलीच नव्हती. त्यामुळे प्रभाग 13-ब मध्ये सर्वसामान्य मतदारांचा सूर स्पष्ट आहे. “हे निवडणूक पत्रक नाही… हा सुनील महाजन नावाच्या उमेदवाराचा स्वच्छ, निर्भय आणि जनतेशी प्रामाणिक असलेला आत्मचरित्रवजा करार आहे! प्रभागाचे भविष्य बदलणार, तो हाच उमेदवार.”

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!