पैशाने तिकीट मिळेल पण, मतदारांचा विश्वास? नाही! संजय मराठे यांच्या विरोधात जनतेचा कल काय

अपनी भाषा में पढ़े! Translate

पैशाने तिकीट मिळेल पण, मतदारांचा विश्वास? नाही! संजय मराठे यांच्या विरोधात जनतेचा कल काय

 

 

अमळनेर : विक्की जाधव

प्रभाग 10-ब मध्ये वर्षानुवर्षे विकास  “जैसे थे” अवस्थेत असल्याने जुन्या राजकारण्यांविरुद्ध नागरिकांचा रोष टोकाला पोहोचला आहे. पेटीभर पैशांनी तिकीट घेणारे तेच चेहरे पुन्हा मैदानात! (ह्या वेळी महिलां उमेदवार देऊन )आले असून २५ वर्षांत स्वतःच्या घराजवळचा रस्ताही न करणारे संजू भाऊ आता मतदारांना विकासाचे स्वप्न दाखवताना दिसतील यात शंका नाही. लाईट, पाणी, स्वच्छता, आणि कामात येणारा नेता या “जुन्या स्क्रिप्टवर” आता प्रभागातील मतदारांनी विश्वास ठेऊन चालणार नाही. इतकी वर्षे सत्ता, आश्वासने आणि राजकीय पोळी भाजली पण प्रभागाचा विकास मात्र शून्यच! असून जनता आता तुम्हाला राम राम करणार

संजू मराठे यांच्या बाबतीत जनतेमध्ये प्रचंड नाराजी दिसत असून विविध माध्यमातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

संकटकाळी कधी दिसत नाहीत, भाऊ मध्यरात्री कुणी अडचणीत असले तर भाऊचा फोन लागत नाही. पण तिकीट मात्र पैशाच्या जोरावर सहज मिळतं.

कुजबुज : 

“संजू भाऊ पट्टा लागला की गायब… बाकी वेळ तर घरालाच कडी!” “सांगा बरे कार्यलय किती दिवसात उघडले, आणि सकाळचा झाडू मारला तरी कोणी. “प्रभागातील मतदार आता स्पष्ट बोलू लागले आहेत: पैशाने टिकीट कापता येतं पण विश्वास कापायला कामे लागतात! आणि तीच कामे संजय मराठे यांच्या खात्यात नाहीत असाही सूर गल्लीबोळात घुमतोय. प्रभाग 10-ब ची जनता आता बदलाच्या मूडमध्ये आहे. त्यांना हवा असा नेता जनतेचे प्रश्न ऐकणारा, रात्री-बेरात्री धावून मदत करणारा, प्रामाणिक आणि साधेपणाने वागणारा. असा नेता संजय मराठे ठरतात का? असा प्रश्न आता लोक स्वतःच विचारत आहेत. कधीही घरची पाह्यरी नं उतरणारे संजू भाऊ गेल्या अनेक वर्षांत किती निवडणुका लढवल्या, किती विजय मिळवला आणि महत्त्वाचे विकासाच्या नावाने किती कामे केली? याचा लेखाजोखा न देता मत मागायचं नाही, अशी जनतेची ठाम भूमिका आहे.

इतकी वर्ष सत्ता उपभोगूनही प्रभागाचा विकास शून्य आहे   यामुळे आता मतदार म्हणताय “या वेळी संजय मराठे OUT

आमदार अनिल पाटील यांच्या आशीर्वादातून मागच्या दरवाजाने तिकीट काढण्यात संजय मराठे यांनी क्षणभरात बाजी मारली असली, तरी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना मात्र चांगल्याच दुखावल्या आहेत. वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणारे, आणि सर्वात महत्त्वाचे प्रभागाशी नाळ जुळलेले देविदास देसले व इतर कार्यकर्ते हे संपूर्ण प्रक्रियेत दुर्लक्षितच राहिले. “निष्ठेला किंमत नाही, पैशालाच मान!” म्हणून लागले आपल्याला केळीचे पान… अशी कुजबुज पक्षांतर्गतच जोर धरू लागली आहे.

या अन्यायाने संतप्त झालेल्या देविदास देसले यांनी अखेर अपक्ष म्हणून रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारास जाहीर पाठिंबा दिला असून, हा निर्णय प्रभागातील समीकरणे अक्षरशः उलथवून टाकणारा ठरणार आहे. देसले समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह असून “लढाई आता खरी सुरू झाली!” असा जोरदार सूर ऐकू येतोय. प्रभागात आता तिकीट नव्हे निष्ठा, काम आणि जनतेचा विश्वास हाच खरा मुद्दा ठरणार आहे.

सविस्तर पुढे देऊच.

विक्की जाधव, मार्मिक समाचार. 917 5050 300

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!