दबावाचे नव्हे, लोकांचे राजकारण प्रभाग 3 मध्ये किरण भाऊ बहारे यांची जोरदार चर्च
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 3 मधून किरण भाऊ बहारे यांची उमेदवारी सर्वसामान्यांना सोबत घेऊन राजकारण करणारे किरण भाऊ बहारे हे दबावाचे, धनशक्तीचे किंवा दिखाव्याचे राजकारण न करता लोकांच्या प्रश्नांत प्रत्यक्ष उभे राहणारे नेतृत्व म्हणून परिचित आहेत. म्हणूनच प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्या नावाभोवती चर्चांना मोठे उधाण आले आहे.
“पैसे नव्हे, काम करणारा नेता हवा”
किरण भाऊ बहारे यांच्या उमेदवारीनंतर प्रभागात एकच चर्चा सुरु आहे काम करणारा नेता हवा, पैशाचे राजकारण नको! गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, वैयक्तिक आणि प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी किरण भाऊंचा सातत्यपूर्ण सहभाग दिसत आला आहे. कोणत्याही वर्ग-पंथाचा भेद न करता सर्वसामान्य नागरिकांशी जिवलग नातेसंबंध ठेवणारी त्यांची शैली मतदारांना भावत आहे. त्यामुळे प्रभाग 3 मधील अनेकांनी “यावेळी सेवा करणारा नेता निवडूया” असा स्पष्ट सूर मांडायला सुरुवात केली आहे.
प्रभाग 3 मध्ये नव्या नेतृत्वाची चाहूल नागरिकांचा वाढता पाठिंबा
किरण भाऊ बहारे यांच्या सभ्य, शांत आणि लोकाभिमुख स्वभावामुळे प्रभागात नव्या नेतृत्वाची आशा निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रचाराची गती दिवसेंदिवस वाढत असून महिलावर्ग, तरुण, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी वर्ग सर्व स्तरांतील लोक त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. “समस्या सोडवणारा, सर्वांना साथ देणारा आणि दबावाला न झुकणारा नेता” ही ओळख किरण भाऊंच्या बाजूने जनमत तयार करत आहे. म्हणूनच प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्यांचा राजकीय धबधबा कायम असून, निवडणुकीत त्यांचे अस्तित्व अधिकाधिक प्रभावीपणे जाणवत आहे.
कुजबूज :
या प्रभागातील एकाने एक सामान्यां उमेदवारास डिली होती धमकी.. हे खरे असेल तर, त्याला त्याच्या नेत्याने दिला कानमंत्र यावेळी धमकी देणारां माफी मागत होता. सविस्तर… लिहू लवकरच..