प्रभाग क्रमांक 12 मधून सुयोग ज्ञानेश्वर धनगर या तरुण उमेदवार जनतेचा उस्फूर्त प्रतिसा
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये यंदा प्रभाग क्रमांक 12 मधून उभे राहिलेले सुयोग ज्ञानेश्वर धनगर हे सर्वात तरुण आणि ऊर्जावान उमेदवार ठरत आहेत. शहराच्या राजकीय इतिहासात इतक्या तरुण वयात थेट जनसेवेच्या रिंगणात उतरलेला उमेदवार सुयोग यांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच प्रभागातील तरुणाईत अभूतपूर्व उत्साह उसळला असून, “नव्या पिढीचा प्रतिनिधी” अशी ओळख त्यांना मिळू लागली आहे.
तरुण विचार नवी दिशा : नागरिकांमध्ये वाढत आहे बदलाची अपेक्षा
सुयोग धनगर यांचा स्वच्छ, निर्भीड आणि परिवर्तनवादी दृष्टिकोन प्रभागातील लोकांना विशेष भावतो आहे. तरुणांच्या रोजगार, शिक्षण, क्रीडा व डिजिटल सुविधांवर भर देण्याचे त्यांचे विचार प्रभागात चर्चेचा विषय झाले आहेत. प्रभागातील महत्त्वाच्या समस्या रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा याबाबत त्यांचा अभ्यासू दृष्टिकोन आणि धडाडीने काम करण्याची तयारी पाहून नागरिकांमध्ये “आता बदल निश्चित” असा विश्वास निर्माण होत आहे. यामुळे सुयोग यांच्या प्रचाराला रोज नवे वेग, नवी गती मिळत आहे.
नव्या नेतृत्वाची चाहूल – ‘बदलाची सुरुवात याच प्रभागातून’ असा जनतेचा सूर
सुयोग धनगर हे केवळ तरुण उमेदवार नसून, प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी जुळलेली आत्मीयता, सामाजिक कार्यातील सक्रियता आणि लोकांच्या प्रश्नांसाठी तत्परता यामुळे ते नव्या नेतृत्वाचे प्रतीक बनू लागले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 12 मध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले असून, तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरातील नागरिकांचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. “तरुण विचार, नवा मार्ग आणि नवे नेतृत्व” या बळावर प्रभाग क्रमांक 12 मध्ये सुयोग धनगर भक्कम उमेदवार म्हणून उदयास येत असल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे.