वॉर्ड 13-ब मधून स्वच्छ प्रतिमेचे अपक्ष उमेदवार – सुनील दयाराम महाजन चर्चे
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक 13-ब (सर्वसाधारण पुरुष) मधून स्वेच्छा सेवा निवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील दयाराम महाजन यांची उमेदवारी जोरदार चर्चेत आली आहे. पोलिस सेवेत असताना पारदर्शक कामगिरी, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि लोकांप्रती सेवाभाव यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. सेवानिवृत्तीनंतर सामाजिक परिवर्तन, तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे आणि जनतेचा विश्वास दाटून येईल अशी कार्यशैली त्यांनी कायम ठेवली आहे.
समाजातील सर्व स्तरांतून वाढत आहे लोकसमर्थन.
सुनील महाजन हे वॉर्ड 13-ब मधील स्वच्छ प्रतिमेचे, प्रामाणिक आणि सहज उपलब्ध होणारे समाजसेवक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शांत, सौम्य आणि लोकाभिमुख स्वभावामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर निर्माण झाला आहे. समाजातील सर्व घटक तरुण, ज्येष्ठ, महिलावर्ग तसेच व्यावसायिक यांच्याकडून सुनील महाजन यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना मजबूत पाठिंबा मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून सुनील महाजन यांनी प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, तरुणांना संधी उपलब्ध करून देणे आणि नागरिकांशी थेट संवादातून समस्यांचे निराकरण करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. राजकारणात नवा परिवर्तनवादी दृष्टिकोन आणण्याचे आणि पारदर्शकता व उत्तरदायित्वावर भर देण्याचे त्यांचे धोरण अनेकांना भावत आहे. म्हणूनच वॉर्ड क्रमांक 13-ब मधील मतदारांमध्ये “स्वच्छ प्रतिमा निष्ठावंत समाजसेवा” या बळावर सुनील महाजन यांच्याबद्दल विश्वास वाढताना दिसत आहे.