नगराध्यक्ष पदासाठी डॉ. परीक्षित बाविस्कर अधिकृत उमेदवार माजी आमदार चौधरी पत्रकार परिषद घेऊन केले स्पष्ट
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषद निवडणुकीत शिंदे सेनेने यंदा अभूतपूर्व तयारी करत 30 शिवसेना + 1 अपक्ष + 2 पुरस्कृत उमेदवार जाहीर करून जोरदार राजकीय दबदबा निर्माण केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार मा. शिरीष चौधरी यांनी डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्याबद्दल विशेष आत्मीयता व्यक्त करत त्यांना “अमळनेरचा कोहिनूर हिरा” असे संबोधले.
विरोधकांनी कितीही अफवा किंवा खोटे आरोप पसरवले, तरी शिंदे सेनेने स्वच्छ प्रतिमा, कोरी पाटी आणि जनतेची सेवा करणारे उमेदवारच मैदानात उतरवले, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. “शिंदे साहेब आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही जनतेस त्रास न देणारे, विकास करणारे लोक पुढे आणले आहेत,” असे मा.आ. चौधरी यांनी स्पष्ट केले.
यावेळी के. डी. बापू दादा पवार पंकज चौधरी सुरेश पाटील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी प्रतिनिधी युवा सेनेचे पदाधिकारी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या उमेदवारीचे जोरदार स्वागत करत, अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
“अमळनेरला शिरपूर–इंदोरसारखा विकास देणार” डॉ. परीक्षित बाविस्कर
नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून बोलताना डॉ. बाविस्कर म्हणाले: “माझे संपूर्ण बालपण अमळनेरमध्ये गेले आहे. माझे घर, माझे आयुष्य, माझी माती सगळं अमळनेरचं आहे. मला शिरपूर आणि इंदोर सारखे यशस्वी विकास पॅटर्न अमळनेरमध्ये राबवायचे आहेत.” ते पुढे म्हणाले की अमळनेर हे लहान शहर असूनही जगातील सर्वाधिक शेअरधारकांचे प्रमाण इथे आहे, त्यामुळे अमळनेर महानगराच्या दिशेने जाण्याची क्षमता ठेवते, फक्त सक्षम नियोजनाची गरज आहे.डॉ. बाविस्कर यांनी रस्ते, गटारी, शहर सुशोभीकरण, महापुरुषांच्या स्मारकांचे संगोपन, आधुनिक सुविधा, पाण्याचा प्रश्न, रोजगारनिर्मिती यांसाठी दूरदृष्टीपूर्ण नियोजनाची भूमिका त्यांनी मांडली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.