प्रभाग ६-अ मध्ये दीपक भाऊ चौगुले यांच्या उमेदवारीने जनतेत उसळला उत्साह
अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६-अ मधून दीपक भाऊ चौगुले यांच्या उमेदवारीची घोषणा होताच परिसरातील नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सामान्य कुटुंबातून आलेले, सहज-सोपा स्वभाव आणि प्रत्येकाशी आपलेपणाने मिळून मिसळणारा कार्यकर्ता म्हणून दीपक भाऊंची ओळख आहे. त्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या सामाजिक कार्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वासाचे वातावरण अधिक दृढ झाले आहे.
समाजबांधव, नागरिक व शुभचिंतकांकडून प्रचंड पाठिंबा.
वार्डातील सर्व समाजबांधव, परिसरातील नागरिक तसेच दीपक भाऊंचे निष्ठावंत शुभचिंतक यांनी त्यांच्या उमेदवारीचे जोरदार स्वागत केले आहे. प्रभागातील विविध स्तरांतील लोकांनी उघडपणे समर्थन दर्शविल्याने निवडणूक वातावरण अधिक रंगतदार बनले आहे. जनतेची वाढती उत्सुकता आणि उमेदवारीनंतर दिसलेली सकारात्मक चर्चा पाहता प्रभाग ६-अ या वेळेस मोठ्या फरकाने परिवर्तन घडवेल, अशी चिन्हे प्रकर्षाने दिसत आहेत.
उपनगराध्यक्ष पदापर्यंतचा मार्ग ‘राजा माणूस’ दीपक भाऊंसाठी जनतेचा विश्वास
दीपक भाऊ चौगुले यांच्या उमेदवारीने केवळ त्यांच्या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात एक वेगळा उत्साह जाणवू लागला आहे. माणुसकी जपणारा, लोकांच्या अडचणीला तत्परतेने धावून जाणारा हा ‘राजा माणूस’ उपनगराध्यक्ष पदासाठीही योग्य दावेदार असल्याचा ठाम विश्वास जनतेत निर्माण झाला आहे. त्यांच्या प्रामाणिकपणावर आणि काम करण्याच्या पद्धतीवर लोकांचा वाढता विश्वास पाहता, आगामी नगरपरिषदेत दीपक भाऊ भक्कमपणे पुढे येतील, अशी शहरभर चर्चा रंगली आहे.