डोंगराळेतील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात अमळनेर प्रांतधिकारी यांना दिले निवेदन.

अपनी भाषा में पढ़े! Translate

डोंगराळेतील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात अमळनेर प्रांतधिकारी यांना दिले निवेदन.

 

अमळनेर : विक्की जाधव 

डोंगराळे येथील चिमुकलीवर घडलेल्या अत्याचारप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त झाला आहे. या घटनेविरोधात अमळनेर येथे सोनार सराफ असोसिएशन, सुवर्णकार कारागीर वेल्फेअर असोसिएशन, सुवर्णकार मित्र मंडळ तसेच शहरातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. सर्वांनी एकमुखाने आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशा भावना व्यक्त केल्या. या अमानुष कृत्याविरुद्ध समाजाने दाखवलेले एकजूट व संवेदनशीलता विशेष उल्लेखनीय ठरली आहे.

प्रशासनाकडे निवेदन – आरोपीवर तातडीने कडक कारवाईची मागणी

या निषेधासाठी नागरिकांनी प्रांत अधिकारी अमळनेर तसेच पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आरोपीवर कठोर आणि तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली. प्रशासनानेही या गंभीर प्रकरणाची दखल घेत आवश्यक ती पावले उचलण्याची हमी दिली. चिमुकलीला न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्व समाज एकत्र येऊन आवाज उठवत असल्याने या आंदोलनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!