December 10, 2025 5:38 am

वारे निवडणुकीचे : अमळनेर शहरात आघाडीत बिघाडी, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संताप उसळला! अनेक सीट पडू 

अपनी भाषा में पढ़े! Translate

वारे निवडणुकीचे : अमळनेर शहरात आघाडीत बिघाडी, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संताप उसळला! अनेक सीट पडू 

 

अमळनेर : पत्रकार विक्की जाधव.

अमळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोर धरू लागली असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी दोन्ही गटांमध्ये प्रचंड चुरस दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात शिंदे सेनेचे कार्यकर्ते नगर परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. शहरातील वातावरणाला निवडणुकीचे वारे चांगलेच लागले आहेत.

दुसरीकडे शहर विकास आघाडी चीं तयारी जोर-धरत आहे. उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ‘पहिल्या परीक्षेत नाव आलं, पण खरी परीक्षा मतदानाची’ असे उमेदवार म्हणत असले तरी पॅनल तयार करताना अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना लटकवून ठेवल्याचा आरोप जोर धरू लागला आहे. खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

प्रभाग क्रमांक 1 ते 18 मधील अनेक जुन्या कार्यकर्त्यांना डावलून इतरांना तिकीट देण्यात आल्याने बंडखोरीची ठिणगी पेटू लागली आहे. ‘आम्हाला कामाला लागा’ असा शब्द देऊन महिनोंमहिने थांबवलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्याने शहर विकास आघाडीवर नाराजीचा भडका उडाल्याचे चित्र आहे. ही नाराजी किती महागात पडते, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

तीस-पस्तीस वर्षे शहरातील जुने अनुभवी भाजपचे कार्यकर्ते कैलास भावसार यांनी या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचा झेंडा हाती घेतला आणि बंडखोरीला पहिली ठिणगी पडली.  नगराध्यक्षपदासाठी अर्ज करणारे निष्ठावंत दिलीप ठाकूर यांना पक्षाने ए.बी. फॉर्म न दिल्याने तेही संतप्त झाले आहेत. “भाजपने माझी फसवणूक केली”, अशी त्यांची थेट प्रतिक्रिया समोर आली आहे. शहर विकास आघाडीने जितू ठाकूर यांना ए. बी. फॉर्म देताच भाजपचे कार्यकर्ते हादरले आहेत.

 

शिंदे यांना होते विविध गटाकडून संधी.

रणजीत शिंदे यांना विविध गट आणि पक्षाकडून संधी असताना देखील त्यांनी त्या नाकारल्या असून ते प्रवाहाच्या साईटला झाले. त्यांनी लावलेल्या होर्डिंग्सवरही आमदार, खासदार यांचे फोटो दिसून आले होते. ह्या वेळी त्यांच्यावरही अन्याय झाला असावा.  परंतु त्यांच्या समर्थकातून अशी भावना निर्माण होत आहे की रणजीत शिंदे यांनी घराघरात वाटलेल्या पत्राचे उत्तर आता मतदानाच्या माध्यमातून देऊ

(पुढे समजेल ते लढतात की फॉर्म मागे घेतात..)

बंडखोरीचे कारण नेत्यांवर नाराजगीचा सूर 

भाजप–राष्ट्रवादी आघाडीमुळे भाजपचे अनेक कार्यकर्ते हतबल झाले असून “शहरात फक्त मतदारसंघ ठेवायचे, आहेत. पण नेते होऊ द्यायचे नाहीत” अशा पद्धतीने वरिष्ठ नेतृत्व वागत असल्याची चर्चा जोर धरत आहे. या नाराजीचा सरळ फायदा शिंदे सेनेला होऊ शकतो, असे राजकीय जाणकार सांगत आहेत. दरम्यान, उमेश वाल्हे, सुरज परदेशी, मुक्तार खाटिक कैलास नामदेव. यांसह अनेक महत्त्वाकांक्षी कार्यकर्त्यांचे तिकीट कापल्याने असंतोष तीव्र झाला. मुक्तार खाटीक तर तिकीट कापले गेल्यामुळे तणावात आजारी पडल्याचे समजते. त्यांना मिळाले पण.. वार्ड 16 चे राजेश बापू शेवटच्या क्षणी यादीत सामावले असले तरी अशा मवाळ भूमिका असणाऱ्या कार्यकर्त्यावरी अशी वेळ येते हेही राजेश बापू यांना बघावयास मिळाले. त्यांच्या समर्थकात नाराजी अजूनही दिसून येते.

प्रभाग 15 मध्ये नगराध्यक्ष पदाच्या दावेदार जयश्रीताई पाटील यांना तिथूनच उमेदवारी देण्याचा अट्टाहास का?

जर आरक्षण ओबीसी सुटले असते तर नगराध्यक्ष पदाचे दावेदार जयश्रीताई पाटील ह्या असत्या परंतु असे न झाल्याने घरचा उमेदवार उपनगराध्यक्ष. पालिकेवर असावा असा अट्टाहास असेल तर त्यांना प्रभाग 15 मधूनचं उमेदवारी देण्याचा अट्टाहास का? हा प्रश्न मतदार विचारू लागले आहेत. ‘हे इलेक्शन नेत्यांचे आहे की कार्यकर्त्यांचे?’ असा संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे संजू ठेकेदार यांचा प्रचार चांगल्या वेगात आहे, तर भावेश जैनसारख्या सॉफ्ट-माईंड कार्यकर्त्यालाही अन्याय झाल्याने प्रभागातील माता-भगिनी, तरुण कार्यकर्त्यांनी त्याला अपक्ष पण तूच असा पाठिंबा जाहीर केला आहे. असे असले तरी कदम यांना थांबावण्यास हरकत काय. साह्यजीराव ऐकतील ही..

एका कार्यकर्त्याने संतापाने म्हटले  “ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, आमदार आणि मंत्री… सर्व पदं तुम्हीच! मग कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का?” हा संवाद शहरभर व्हायरल झाला. दुसऱ्या कार्यकर्त्याने अधिक थेट प्रतिक्रिया दिली  “स्मिता ताई खासदार आहेत, पण त्यांच्या शब्दाची किंमत राहिली नाही.”

प्रभाग 1 मधील कैलास नामदेव पाटील यांनाही तिकीट न मिळाल्याने त्यांचे समर्थक शिंदे सेनेला उघड पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. एकंदरीत शहर विकास आघाडीत बिघाडी स्पष्ट दिसत आहे. “फक्त पैसा हेच गणित असेल, तर डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांच्या पॅनल ने गुलाल उधळायलाच हरकत नाही,” अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे.

 

       पुढील वृत्त लवकरच..

विक्की जाधव. 91750 50300

(मार्मिक समाचार)

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!