चोर्हाळा येथील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्यांची विष पिऊन आत्महत्या ।

अपनी भाषा में पढ़े! Translate

चोर्हाळा येथील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्यांची विष पिऊन आत्महत्या ।

भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील .।

भोकरदन तालुक्यातील चोर्हाळा येथील तरुण शेतकरी विजय नवलसिंग महाले वय वर्षे 40 यांनी विष प्राशन करून कर्ज आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानी मुळे आत्महत्या केली. याबाबतची सविस्तर हकिकत अशी की विजय महाले यांनी शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान शेतात तणनाशक फवारणीसाठी आणलेलं विषारी औषध पिऊन आपले जीवन संपविले. त्यांना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथील डॉ.नी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात नेण्यात आले तेथे विजय यांच्या वर उपचार सुरू होते.शनिवारी संध्याकाळी 7 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांचे ही तिनं वर्ष पुर्वी निधन झाले आहे. वडीलाचे जमीन चा फेर ही त्यांच्या नावांवर झाला नव्हता. भोकरदन तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांचे दिड एकर शेती क्षेत्र पाण्याखाली गेले होते. सतत वाढत जाणारा कर्जाचा डोंगर न पिकणारी शेती निसर्गाच्या लहरी पणा यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. या नैर्याशातुनच त्यांनी स्वतःचे जिवन संपविले . त्यांच्या पश्चात आई, पत्नी,एक मुलगा, मुलगी, पुतण्या, भावजयी असा परिवार आहे. चोर्हाळा गावात हळहळ
तरुण शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या मुळे गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!