प्रभाग 18-ब मधून शशिकला ताई महाजन यांच्या विजयाचा उमटतोय जोरदार सूर

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 18-ब मधून शशिकला ताई महाजन यांच्या विजयाचा उमटतोय जोरदार सूर

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18-ब मध्ये शशिकला ताई महाजन यांचा प्रचार झपाट्याने वेग घेत आहे. प्रचारादरम्यान नागरिकांचा वाढता सहभाग, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, यामुळे प्रभागातून विजयाचा स्पष्ट सूर उमटतोय अशी चर्चा सर्वत्र होत आहे. स्थानिक प्रश्नांवर अभ्यासू दृष्टी, जमिनीवरची नाळ आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध असलेली शशिकांला ताई आणि त्यांचा नातू आकाश यांची कार्यपद्धती मतदारांना भावते आहे.

महिला नेतृत्वाचा नवा अध्याय महिलांच्या उत्साहाने प्रचारात रंगत

शशिकला ताईंच्या प्रचारात महिलांचा सहभाग विशेषतः उल्लेखनीय ठरत आहे. घराघरात जाऊन केलेले संवाद, महिला बचतगटांचे प्रश्न, सुरक्षितता, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या विषयांवरील त्यांच्या भूमिका प्रभागातील महिलांना जवळच्या वाटतात. “महिला नेतृत्व पुढे येणार” असा आत्मविश्वास महिलांमध्ये दिसत असून, शशिकलां ताईंसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी नागरिकांनी दाखवली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रभागात एक सकारात्मक आणि परिवर्तनवादी लहर निर्माण झाली आहे.

शब्द नव्हे तर शस्वती  लोकांमध्ये ताईंच्या कार्याची मजबूत पकड

शशिकला ताई महाजन यांना मिळणारा जनसमर्थनाचा ओघ हा केवळ राजकीय लाट नसून, त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची मिळालेली शस्वती असल्याचे मतदार व्यक्त करू लागले आहेत. विकासकामांसाठी ताईंचा सक्रीय सहभाग, समाजातील प्रत्येक घटकांसाठी केलेली मदत आणि समस्यांना तातडीने दिल्या जाणाऱ्या उत्तरांमुळे त्यांच्या नेतृत्वाविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यामुळे प्रभाग 18-ब मध्ये “परिणामकारक नेतृत्व  प्रामाणिक काम” याची नवी ओळख निर्माण होत असून, शशिकला ताई महाजन यांच्या विजयाचा सूर दिवसेंदिवस अधिक बुलंद होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!