ऊस वाहतूक जोमात;काय टेप चा आवाज, काय ती उसाची ओव्हरलोड वाहतूक, काय त्यांची मिजाश यामुळे मदनवाडी येथील युवकाचा घेतला ना बळी

अपनी भाषा में पढ़े! Translate

ऊस वाहतूक जोमात;काय टेप चा आवाज, काय ती उसाची ओव्हरलोड वाहतूक, काय त्यांची मिजाश यामुळे मदनवाडी येथील युवकाचा घेतला ना बळी

(निलेश गायकवाड)

भिगवण :नुकताच गळीत हंगाम सुरू झाला असून ट्रक, ट्रॅक्टर- ट्रॉली यातून उसाची वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, हीच वाहतूक जीवघेणी ठरू लागली आहे. ऊस ट्रॉलीचे जुगाड अनेकदा अपघाताला कारणीभूत ठरू लागले आहे.मदनवाडी येथे या वाहतुकीने पहिला बळी घेतला.मदनवाडी येथील किशोर बाळासाहेब साळुंखे वय 30 रा. मदनवाडी या शेतकऱ्याचा काल दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी अंदाजे 7 वा सुमारास मदनवाडी येथील स्वागत कमान जवळ अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेमध्ये निलेश बाळासो साळुंखे यांनी भिगवन पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करत आरोपी महिंद्रा कंपनीचा अर्जुन 605 लाल रंगाचा ट्रॅक्टर MH18CE7152 यावरील अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पुढील अधिकचा तपास अधिकारी उगले हे करत आहेत.

प्रत्येक वर्षी ऑक्टोबर ते मार्च असा सुमारे सहा महिने कारखान्यांचा गाळप हंगाम चालतो. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत उसाची लागवड केली जाते. सर्व तालुक्यांतील रस्त्यांवर सहा महिन्यांपर्यंत ऊस वाहतूक सुरू असते. मात्र, कुठेही वाहतूक नियम पाळले जात नाहीत. परिणामी, दरवर्षी शेकडो दुचाकीचालकांचे जीव जात आहेत. यावर वाहतूक पोलिस आणि आरटीओ कार्यालयही मूग गिळून गप्प आहे. ऊस वाहतूकदार आणखी किती लोकांचे जीव घेणार आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य दुचाकीचालकांमधून विचारला जात आहे. यामुळे धोकादायक ऊस वाहतुकीवर योग्य तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.

मदनवाडी येथील साळुंखे या युवकाचा मृत्यू नसून एकप्रकारे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालकांनी केलेला खून आहे असे म्हणावे लागेल. यामध्ये प्रामुख्याने ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक वरदळीच्या किंवा गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची काळजी घेताना दिसून येत नाहीत. मदनवाडी चौक हा नेहमी गजबजलेला परिसर असतो या ठिकाणी चारी बाजूने होणारी वाहतूक ही मदनवाडी चौकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी खुली असते. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक दरवर्षी या मदनवाडी चौकात ते शेटफळगडे या गावापर्यंत जात असताना कमीत कमी चार ते पाच जणांचा बळी घेऊनच जातात. ही ऊस वाहतूक दरवर्षी जीवघेणी ऊस वाहतूक ठरत आहे. कारण ही तशा प्रकारचे दिसून येते ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक बेधुंदपणे ट्रॅक्टर चालवत असतात. ट्रॅक्टर चालवताना मोठ्या आवाजामध्ये गाणी लावणे, वेगात ट्रॅक्टर चालवणे, गतिरोधक जरी आला तरी मोकळा ट्रॅक्टर जोरात पाळवणे, ओव्हरटेक करणे, रिफ्लेक्टर ट्रॅक्टरला नसणे अशी नाना विविध कारणे या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांकडून होत आहेत. आणि हे ट्रॅक्टर चालकांना त्यांच्या मालकांकडून देखील कोणत्याही प्रकारच्या सूचना दिलेल्या जात नाहीत यामध्ये ट्रॅक्टर चालकांबरोबर ऊस वाहतूक करणारे मालक देखील तेवढेच जबाबदार आहेत असे म्हणावे लागेल.आणि याला कारणीभूत देखील कारखाने तेवढेच जबाबदार आहेत.

मदनवाडी येथे दरवर्षी ऊस वाहतूक करणाऱ्या या ट्रॅक्टर चालकांवरती कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी वाहतूक करण्यासाठी काळजी घेतली जात नाही. प्रशासनाकडून यांच्यावर ठोस पावले उचलली जात नाहीत. तात्पुरत्या स्वरूपाची पाऊले उचलल्यामुळे या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची मुजोरी वाढत चालली आहे. मदनवाडी येथील ग्रामस्थांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्वात महत्त्वाचे ग्रामस्थ देखील या गंभीर विषयावरती कोणत्याही प्रकारचा आवाज उचलण्यासाठी किंवा प्रशासनाचे कान पकडण्यासाठी पुढे येताना दिसून येत नसल्याने सर्वात मोठी खंत व्यक्त केली जात आहे. जेव्हा एखादा गरीबाचा बळी जातो त्यावेळेस तात्पुरत्या स्वरूपात त्या हालचाली फक्त पाहायला मिळतात…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!