कु. डॉ. वेदांती देशमुखचा तेजस्वी यशप्रकाश!

अपनी भाषा में पढ़े! Translate

कु. डॉ. वेदांती देशमुखचा तेजस्वी यशप्रकाश!

एम.एस. (गायनॅक) साठी एस.एम.बी.टी. वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे प्रवेश

 

 

अमळनेर : विक्की जाधव

अमळनेरची कन्या कु. डॉ. वेदांती सतिष देशमुख हिने आपल्या परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर पी.जी. नीट परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत वैद्यकीय क्षेत्रात नवी झेप घेतली आहे. तिच्या या यशामुळे केवळ परिवाराचाच नाही तर संपूर्ण शहराचा अभिमान उंचावला आहे. वेदांतीला नाशिक येथील एस.एम.बी.टी. वैद्यकीय महाविद्यालयात एम.एस. (गायनॅक) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे.

साने गुरुजी विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. एस. डी. देशमुख यांची ही सुकन्या असून, तिच्या यशामागे कठोर परिश्रम, चिकाटी, परिवाराचे मार्गदर्शन आणि गुरुजनांचे आशीर्वाद आहे. वेदांतीचे प्राथमिक शिक्षण साने गुरुजी विद्यामंदीर, माध्यमिक शिक्षण साने गुरुजी कन्या विद्यालय आणि महाविद्यालयीन शिक्षण प्रताप कॉलेज, अमळनेर येथे झाले. विशेष म्हणजे १२ वी मध्ये ती नाशिक बोर्डात भौतिकशास्त्र (Physics) विषयात प्रथम क्रमांकावर आली होती.डॉ. वेदांतीच्या या यशाबद्दल तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, सर्व शिक्षक, नातेवाईक आणि मित्रपरिवार तिचे मनःपूर्वक अभिनंदन करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तिची ही वाटचाल प्रेरणादायी ठरावी, अशा शुभेच्छाही देण्यात येत आहेत.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!