फडणवीस तुम्हाला देवेंद्र ‘जी’ म्हणावं की देवेंद्र ‘शी’ ?
– दत्तकुमार खंडागळे
साप्ताहिक वज्रधारीच्या अग्रलेखात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत लिहीत असताना आम्ही नेहमीच ‘देवेंद्रजी’ असच लिहीत आलो आहोत, पण सद्य स्थिती पाहता इथून पुढे असा उल्लेख करावा का ? ‘देवेंद्र’ या शब्दापुढे ‘जी’ जोडावं की ‘शी’ जोडावं ? देवेंद्र ‘जी’ लिहावं की देवेंद्र ‘शी’ लिहावं असा आम्हाला प्रश्न पडला आहे. कारण गेल्या काही वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची अक्षरश: गटारगंगा केली आहे. देशातल्या इतर राज्यापेक्षा महाराष्ट्राला वेगळी ओळख, वेगळा वारसा व परंपरा होती. होय, नाईलाजाने ‘होती’ म्हणावं लागतय कारण सध्या तो वारसा आणि परंपरा उरलेली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाची फडणवीस आणि त्यांच्या चेले-चपाट्यांनी पुरती हागणदारी करून टाकली आहे. फडणवीसांनी त्यांच्या अवतीभोवती काही माणसं सांभाळली आहेत. आम्ही ‘पाळली’ आहेत असं लिहीणार नाही कारण माणसं सांभाळली जातात आणि कुत्री पाळली जातात. त्यामुळे देवाभाऊंच्या टिममध्ये असणा-या पण पात्रता नसण-या हिडीस व विकृत लोकांच्या माणूसपणाचा आदर करत आम्ही, ‘पाळली’ आहेत असा शब्दप्रयोग करणार नाही. कारण ती कशीही असली तरी माणसं आहेत. पिसाळलेली असली, पिसाटलेली असली, टूकार असली किंवा माजलेली असली तर ती माणसंच आहेत. देवाभाऊ त्याचे पालन करत असतील तरीही आम्ही त्यांना ‘सांभाळली’ आहेत असेच म्हणू. देवाभाऊंच्या टिममधली ही माणसं अत्यंत हिडीस आणि बिभत्स पध्दतीने बोलत आहेत. त्यांची भाषा व त्यांची हिडीस संस्कृती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला झालेला कँन्सर आहे. अशा विकृत लोकांना विरोधी पक्षातील नेत्यांच्या अंगावर सोडायचे, त्यांना बदनाम करायचे, जेरीस आणायचे व शरण यायला भाग पाडायचे अशी ‘नपुंसक खेळी’ फडणवीस खेळत आहेत. आज “देवाभाऊ देवाभाऊ” म्हणून जे जे लोक उदो उदो करत आहेत ते सगळेच या पिलावळीत येतात. या लोकांना फडणवीसांनी विरोधी पक्षातला एक एक नेता वाटून दिला आहे. कारण जन-माणसात स्थान असलेल्या विरोधी पक्षातल्या लोकांच्या प्रतीमेवर हल्ले केले, त्यांची प्रतिमा मलिन केली, डागाळली तर ते घाबरतील व शरण येतील असा ‘भटी कावा’ फडणवीस करताना दिसत आहेत. त्यांच्या या कावेबाज बदमाशीने महाराष्ट्राच्या राजकारणाची पार वाट लावली आहे. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्या बजबजपुरी झाली आहे आणि हे पाप नि:संशय देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. त्यामुळे त्यांना देवेंद्र ‘जी’ म्हणावे की देवेंद्र ‘शी’ म्हणावे ? असा प्रश्न पडला आहे. आमच्याकडे एखाद्या लहान मुलाने घाण केली तर त्याला ‘घाण’ केली असं म्हणत नाहीत तर ‘शी’ केली असं म्हणतात. देवेंद्र फडणवीस राजकारणाच्या नावाखाली सध्या जे काही करत आहेत ते ‘शी’ या सदरात मोडते. त्यामुळे त्यांच्या नावापुढे ‘जी’ पेक्षा ‘शी’ अधिक शोभून दिसेल.
फडणवीसांनी त्यांच्या टिममधील प्रत्येक माणसाला विरोधी पक्षातला एक एक माणूस वाटून दिला आहे. त्याने त्या त्या माणसावर कमालीची चिखलफेक करायची. अत्यंत खालच्या पातळीवर जात, मर्यादा सोडून, सभ्यता सोडून टिका करायची. एकेरी बोलायचे. त्याचा आई-बाप काढायचा. जन-माणसात त्या माणसाची प्रतिमा डागाळली पाहिजे, मलीन झाली पाहिजे. त्याच्या बाबत वाटणारा व असलेला आदर संपला पाहिजे अशा पध्दतीने त्याच्यावर हल्ला करायचा. एकीकडून असे शाब्दिक हल्ले घडवायचे तर दुसरीकडून सरकारी यंत्रणेद्वारे त्याला जखडायला पहायचे. समोरचा माणूस वैतागून शरण आला पाहिजे. आपल्या समोर वाकला, झुकला पाहिजे अशीच मानसिकता या मागे आहे. त्यामुळे टिम देवाभाऊ सध्या जोमात आहे. रोज कुणीतर कुठेतर जाहिरपणे ‘शी’ करतो आहे. मिडीयाने या बाबत देवाभाऊंना जर विचारलेच तर “मी त्यांना समज दिली आहे. ते चांगले नेते आहेत. त्यांना खुुप भविष्य आहे !” असं ते सांगतात. म्हणजे तुम्ही विरोधी नेत्यांच्यावर पातळी सोडून बोलाल, मर्यादा सोडून टिका कराल, जितक्या जास्त घाणेरड्या शिव्या द्याल, खालच्या स्तराची भाषा वापराल तेवेढे जास्त तुम्हाला देवाभाऊंकडे भविष्य आहे. त्यामुळे तुम्ही नेटाने शिव्या द्या, घाण घाण बोला. विरोधी नेत्यांच्या आई-बाप काढा. राज्याच्या राजकारणाची पार हागणदारी करा. याचे बक्षिस म्हणून तुम्हाला आमदार करू, खासदार करू, मंत्री करू असा अप्रत्यक्ष संदेश फडणवीस देतात. आमचे ‘दांडकेवाले’ भाईबंद याला ‘कान टोचले’ असं म्हणतात. “अमक्या अमक्याचे फडणवीसांनी कान टोचले !” असे मथळे स्क्रीनवर दिसतात. नशिब टोचले म्हणतात, उपटले म्हणत नाहीत कारण काय उपटले ? असाही प्रश्न कुणीतर उपस्थित करू शकतं.
फडणवीसांनी या लोकांना काम देताना प्रत्येकावर वेगवेगळ्या माणसाची जबाबदारी दिली आहे. कुणाच्या वाट्याला उध्दव ठाकरे दिलेत, कुणाच्या वाट्याला शरद पवार दिलेत, कुणाच्या वाट्याला अजित पवार दिलेत, कुणाच्या वाट्याला जयंत पाटील दिलेत, तर कुणाच्या वाट्याला सुप्रिया सुळे दिल्यात. प्रत्येक माणसाला वेगवेगळा नेता वाटून दिला आहे. या शिवाय या विकृत माणसांच्या मागेपुढे आमचे सुपारीबाज मिडीयावाले भाईबंद दिलेत. त्यांनी हातात दांडकी घ्यायची व या टुकार लोकांच्या सतत मागेपुढे करत त्यांच्या तोंडातली हागणदारी महाराष्ट्रभर पसरवायची. त्यांना जाणीवपुर्वक काही प्रश्न विचारायचे. त्यावर त्या महाशयांनी आपल्या तोंडातून विष्ठा बाहेर टाकायची. ती विष्ठा आमच्या मिडीयातील भाईबंदांनी तळागाळापर्यंत पोहोचवायची. मग त्यावर पुन्हा क्रिया-प्रतिक्रीया घ्यायच्या. पुन्हा पुन्हा तोच विषय चर्चेत ठेवायचा. त्यांच्या तोंडातली गरळ माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवायची. आमच्या मिडीयातील भाईबंदानाही हा ‘टास्क’ च दिलेला आहे. ज्याला चांगले काम करता येईल, जो या टूकार नेत्यांच्या तोंडातली हागणदारी अधिक नेटाने तळापर्यंत पोहोचवेल त्यालाही चांगले बक्षिस दिले जात असावे. इतर लाभ तसेच पक्षाचे प्रवक्ते पद वगैरे दिले जात असावे. थेट देवाभाऊसोबत पक्षात काम करणारी व दुसरी मिडीयात पत्रकार म्हणून काम करणारी अशा दोन वेग-वेगळ्या टिम देवाभाऊंनी नेमल्या आहेत. त्यांना सत्तेचा मलिदा मिळाला की ते ही खुष. कुणालाही चावायला मोकळेच.
या लोकांना सत्तेचा मलिदा वेगवेगळ्या स्वरूपात दिला जात असावा. कारण ते त्यांना दिलेला ‘टास्क’ पुर्ण करत आहेत. भाजपात आयुष्य घालवलेले सुधीर मुनगंटीवारांसारखे लोक आज अडगळीत आहेत. हयातभर माध्यमातून सभ्यपणे पक्षाची बाजू मांडणारे माधव भंडारीसारखे लोक दुर्लक्षीत-उपेक्षित आहेत. गावागावात जाऊन पक्ष बांधणी करणारे, पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवणारे एकनाथ खडसेंसारखे लोक उपेक्षेला वैतागून दुस-या पक्षात गेले अन इथे मात्र कुठल्या तरी पात्रता नसलेल्या लोकांना फक्त चांगल्या शिव्या देता येतात, विरोधकांची लायकी, अब्रू काढता येते या मेरीटवर भाजपाची पदं वाटली जातात. “पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा आणि वेश्येला मणीहार” अशी एक मराठीत म्हण आहे. भाजपात फडणवीसांच्या कृपेने या म्हणीचा प्रत्यय येतो आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केलेली ही हागणदारी फार काळ टिकणार नाही. एक दिवस लोक याला वैतागतील आणि त्यांच्या संयमाचा कडेलोट झाला तर त्याची फळंही त्यांना भोगावी लागतील. नेपाळमध्ये लोकांनी नेत्यांना चोप दिला. तो दिवस इकडेही उगवू शकतो. संतापलेले लोक देवाभाऊंनी सांभाळलेल्या या लोकांना फोडतीलच पण देवाभाऊंच्या अंगावरील कपडेसुध्दा फाडतील. त्यामुळे देवाभाऊंनी ‘टिम देवाभाऊ’ ला चाप लावावा. बुडात दम असेल तर विचाराचे व मुद्याचे राजकारण करावे. फडणवीसांनी विरोधी पक्षात असताना अत्यंत सोज्वळपणे काम केले. त्यांची भाषा, त्यांची भाषण, कामाची पध्दत अतिशय सभ्य व सुसंस्कृत होती. पण ते जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्याचा तो मुखवटा गळून पडला. ते आपल्या ख-या औकादीवर आले. त्यांनी आपले खरे सुळे दात बाहेर काढले. सुसंस्कृत व सोज्वळ वाटणारे फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाची हागणदारी करतील असं कधीच वाटल नव्हतं. पण त्यांनी ती केली आहे. फडणवीसांच्या हातात सत्तेचा परिस असल्याने त्यांच्या गुप्तांगाला अनेक स्वार्थी गोचड्या चिकटल्या आहेत. या स्वार्थी गोचड्या फडणवीसांचा केवळ उदो उदो च करत राहणार व सत्तेचे रक्त प्राशन करणार. अशा गुप्तांगाला चिकटलेल्या स्वार्थी गोचड्यांना हा लेख पेलणार नाही. ते आमच्या नावाने ‘शी’ करायला पुढे येणार याचीही आम्हाला खात्री आहे. त्यामुळे त्यांचेही स्वागत.