ग्रामविकासासाठी समृद्धी पंचायत राज अभियान : गडखांब ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम.
अमळनेर ता : विक्की जाधव
मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत गडखांब ग्रामपंचायतीने आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि वृक्ष संवर्धन या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प हाती घेतला. ग्रामसभेत नागरिकांना योजनांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच वृक्षांचे संगोपन, संरक्षण आणि पर्यावरण रक्षणाचे संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आले.

ग्रामपंचायतीच्या वतीने पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी सेवेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार श्रीफळ व एक वृक्ष देऊन करण्यात आला. या उपक्रमामुळे तरुणाईला प्रेरणा मिळाली असून गावाचा मान अधिक उंचावला आहे.
याशिवाय पंचक्रोशीतील एकूण लोकसंख्येइतकी वृक्षलागवड करून ग्रामपंचायतीने हरित संकल्प साकारला. सरपंच नितीन बापूराव पाटील, उपसरपंच आणि सर्व सदस्यांच्या पुढाकारामुळे गडखांब ग्रामपंचायत पर्यावरण, शिक्षण आणि ग्रामविकासाचा आदर्श ठरत आहे.