भटके विमुक्त जातींच्या सामाजिक प्रतिनिधींनी भटके विमुक्त दिवस एकत्रित येऊन केला साजरा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

भटके विमुक्त जातींच्या सामाजिक प्रतिनिधींनी भटके विमुक्त दिवस एकत्रित येऊन केला साजरा..

 

अमळनेर : विक्की जाधव.

भटके विमुक्त जातींच्या सामाजिक प्रतिनिधींनी भटके विमुक्त दिवस एकत्रित नांदेडकर सभागृह येथे सामाजिक चिंतन कार्यक्रमातून साजरा केला.वासुदेव जोशी गोंधळी समाज पंचमंडळ अमळनेर तर्फे आयोजित सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. जि प सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील या उपस्थित होत्त्या. अमळनेर तालुक्यातील भटके विमुक्त समाज घटकांसाठी आ.अनिल दादा पाटील यांचे माध्यमातून भटक्या विमुक्त दिवस येईपर्यंत भटके विमुक्त सामाजिक भवन निर्माण करून देऊ असे आश्वासन यावेळी अध्यक्षिय भाषणात सौ.जयश्री अनिल पाटील यांनी दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,संत सेवालाल महाराज,संत भिमा भोई, स्व.वसंतराव नाईक, स्वातंत्र सैनिक सुपडू जोशी यांचे प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.अमळनेर अर्बन बॅकेचे संचालक सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांना वाचा फुटावी व शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचावा यासाठी भटके विमुक्तांनी दिवस साजरा करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे असे सांगितले

याप्रसंगी अर्बन बँक संचालिका सौ.वसुंधरा लांडगे यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात स्वातंत्र्य आंदोलनात इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या भटक्या विमुक्तांनी सामाजिक पातळीवर संघटित व्हावे असे आवाहन केले.सामाजिक कार्यकर्ते बन्सीलाल भागवत यांनी , एकत्र येणे हि सुरुवात आहे असे सांगत भविष्यात आपल्या सर्व समाज घटकांच्या सामाजिक प्रगतीसाठी एकत्रित काम करावे लागेल असे सांगितले.सामाजिक कार्यकर्ते सुनिल भोई यांनी पुढील भटके विमुक्त दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे नियोजन करू असे जाहिर केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक समाजाचे अध्यक्ष विलास दोरकर ,उपाध्यक्ष नारायण शिंदे यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला.मंचावर भोई समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संदीप भोई, वासुदेव जोशी गोंधळी समाजाचे रतिलाल भोपे यांचेसह सामाजिक कार्यकर्ते,अर्बन बॅक संचालक रणजित शिंदे,सौ.वसुंधरा लांडगे, बन्सीलाल भागवत ,सौ.सीमा भोपे, यांचेसह एस सी तेले, मनोज शिंगाने, चंद्रकांत कंखरे, राहुल गोत्राळ , राहुल कंजर, दशरथ शिंदे, रमेश चव्हाण, चंद्रशेखर वैद्य,पंकज भोई,प्रा.गजानन धनगर, प्रदिप कायंदे, दिपक शिंदे, विष्णू जाधव,राम खेडकर,मोहन भाई,बापू भोई,रमेश धनगर,संजय भोई ,सरजू अभंगे,हरीश जोशी,गोकुळ बागडे, रविंद्र शिंदे, मकरंद निळे आदिंसह प्रमुख सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी सैनिक सदस्य दिनेश नाईक, म.वा.मंडळाचे कार्यवाह नरेंद्र निकुंभ, महेंद्र सोनार यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास दोरकर ,नारायण शिंदे,रोहित भोपे, प्रशांत शिंदे ,मोहन भोई, आदित्य दोरकर, यतीश शिंदे अभिषेक पांडे,सुनिल भोई,संजय भोई, आनंदा धनगर आदींसह मोठ्यासंखेने भटक्या विमुक्त समाज घटकांचे सामाजिक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत शिंदे यांनी तर प्रास्ताविक विलास दोरकर ,आभार प्रदर्शन नारायण शिंदे यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!