बोराडी, फार्मसी महाविदयालयात डॉ. तुषार रंधे व आशाताई रंधे यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजन…

अपनी भाषा में पढ़े! Translate

बोराडी, फार्मसी महाविदयालयात डॉ. तुषार रंधे व आशाताई रंधे यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजन…

बोराडी – किसान विदया प्रसारक संस्थेचे इंस्टिटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन, बोराडी या महाविदयालयात किसान विदया प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हापरीषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे व किसान विदया प्रसारक संस्थेचे खजिनदार आशाताई रंधे यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजीत करण्यात आले. या शिबिरात सुमारे ११८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्याक्रमास सचिव निशांत रंधे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, कर्मवीर पथसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, नगरसेवक रोहित रंधे,विश्वस्त . शामकांत पाटील, मधुर रंधे, ज्ञानेश्वर बडगुजर, दिनेश पाटील, राज निकम, संजय पाटील, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. कल्पेशकुमार वाघ,राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
. सदर शिबीरात फार्मसी महाविदयालयाचे ११८ कर्मचारी व विदयार्थ्यांने रक्तदान करुन सहभाग नोंदवीला रक्तदान शिबीरासाठी जिवन ज्योती ब्लड सेंटर, धुळे यांचे योगदान लाभले तर फार्मसी महाविदयालयातील विदयार्थ्यांनी पर्यावरण पुरक शाळु मातीची गणपती बनवायाची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यात एकुण ४८ विदयार्थ्यांनी सहभाग नोंदविला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविदयालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परीश्रम घेतले
सदर कार्यक्रमा बददल किसान विदया प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हापरीषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, कर्मवीर पथसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, नगरसेवक रोहीत रंधे, यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!