जय बजरंग मंडळाची आगमन मिरवणूक उत्साहात – नगरपालिकेच्या निष्क्रियतेवर मंडळांनीच केली रोषणाई
अमळनेरात गणेशोत्सवाचा जल्लोष..
अमळनेर : विक्की जाधव.
लाडक्या गणरायाच्या आगमनाने संपूर्ण शहर सणाच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत असून, जय बजरंग गणेश उत्सव मंडळाची आगमन मिरवणूक काल सायंकाळी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मोठ्या थाटात पार पडली. तरुण, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मिरवणुकीत डीजेच्या तालावर भक्तीभावाने जल्लोष केला.

शहरातील मुख्य दगडी दरवाजा व परिसरात पान खिडकी मंडळाकडून स्वखर्चाने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जे काम नगरपालिकेला साधले नाही ते सामाजिक उपक्रम करणाऱ्या मंडळांनी करून दाखवल्याचे शहरवासीयांनी कौतुकाने बोलून दाखवले.
त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा भक्तीबरोबरच एकतेचा आणि लोकसहभागाचा अनोखा संदेश देणारा ठरला आहे.