अमळनेरात दादा पवार यांच्या शिवप्रेरणा गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या गणेशोत्सवाची धूमधडाक्यात सुरुवात..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरात दादा पवार यांच्या शिवप्रेरणा गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या गणेशोत्सवाची धूमधडाक्यात सुरुवात..

 

अमळनेर  : विक्की जाधव.

श्री शिवप्रेरणा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री दादा पवार यांचा मानाचा गणपती यंदा ३१व्या वर्षात दाखल होत असून, गणेशभक्तांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजिली आहे. नगरसेवक दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्यदिव्य गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

काल २७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात दररोज प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार व गायक मंडळींनी भक्तीचा रंगतदार कार्यक्रम सादर करणार आहेत. यामध्ये ह.भ.प. बाळासाहेब महाराज शिंदे, ह.भ.प. माळी महाराज काकडे, ह.भ.प. अनिल महाराज तुपे, ह.भ.प. प्रकाशजी महाराज, ह.भ.प. वैष्णवी दिदी सूर्यवंशी, ह.भ.प. गोविंद महाराज यांचा समावेश आहे. तसेच १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सत्यनारायणाची महापूजा होणार असून, २ सप्टेंबर रोजी सकाळी महाप्रसाद (भंडारा) व सायंकाळी श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीने उत्सवाची सांगता होणार आहे.

ओम साई लहरी भजनी मंडळाचे सुमधुर भजन आणि भक्तीभावनेने नटलेले वातावरण यामुळे दादा पवारांचा मानाचा गणपती उत्सव अमळनेरातील भाविकांसाठी खास ठरणार आहे. सर्व गणेश भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!