अमळनेरकरानो सावधान : संभागृह उभारण्यासाठी नव्हे! डागडूची साठी केला लाखो रुपयाचा अपहर..
अमळनेर : विक्की जाधव.
भारत सायकल मार्ट समोर असलेल्या पारधी समाजाच्या सभागृहाबाबत यापूर्वीच नगरपरिषदेच्या निकृष्ट कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. लाखो रुपये खर्च करून उभारलेले हे सभागृह आधीच उध्वस्त अवस्थेत उभे आहे. मात्र आता नव्याने उघड झालेल्या माहितीप्रमाणे सभागृहाच्या डागडुजीसाठीच तब्बल लाखो रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. खरे तर सभागृहासाठी खर्च झालेले पैसे कुठे गेले हा प्रश्नच कायम आहे, त्यात आता डागडुजीच्या नावाखाली नगरपरिषद प्रशासनाने पुन्हा जनतेच्या पैशावर कुरघोडी केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अश्या कॉन्ट्रॅक्टरची झोळी प्रेमाने भरली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
“अमळनेरकरांनो सावधान! तुमचा पैसा टक्केवारीत तर नाही जात?” असा थेट सवाल शहरवासीय करत आहेत. नगरपरिषदेचा हा कारभार म्हणजे थेट जनतेची फसवणूक असल्याचे बोलले जात आहे.
यामध्ये “पप्पू” नामक ठेकेदाराचा सहभाग असल्याची जोरदार चर्चा असून, त्याचे पाढे वाचून काळे धंदे लवकरच बाहेर येणारच आहेत. शहरातील संतप्त नागरिकांची आता या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सभागृह उभारणीपासून ते डागडुजीपर्यंत सुरू असलेल्या या आर्थिक घोटाळ्यामुळे नगरपरिषद प्रशासनावर तीव्र टीकेची झोड उठली आहे.
