स्वच्छते संदर्भात नागरिकांत नाराजी वार्ड क्र. ३ मधील नागरिकांनी दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन..
अमळनेर : विक्की जाधव.
वार्ड क्र. ३ मधील नागरिकांनी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या स्वच्छता व आरोग्याच्या मूलभूत प्रश्नांसंदर्भात तसेच परिसर प्रगतशील करण्याच्या मागणीसाठी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. या प्रसंगी परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन होणाऱ्या त्रास बद्दल निवेदन दिले

यावेळी पंकज भाऊ भोई, राजेंद्र पाटील, समाधान कुवर, सागर महाजन, विनोद निकुंभ, संजय जगन्नाथ पाटील, सुरेश कुंभार, संजय पाटील यांच्यासह सर्वच परिसरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी स्वच्छतेच्या अभावामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या, तसेच पायाभूत सुविधांच्या अभावामुळे होणाऱ्या गैरसोयींविषयी नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले.परिसर स्वच्छ, सुरक्षित व प्रगतशील व्हावा, यासाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी नागरिकांनी केली असून, प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.