जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर यशाला कवेत घ्या
परीट महासंघाच्या वतीने गुणगौरव सोहळा.

नाशिक : महाराष्ट्र राज्य धोबी वरठी परिट समाज महासंघाच व राजेंद्र शेठ अंबादास शेठ आहेर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला.यावेळी शासकीय सेवेत तसेच दहावी,बारावी,पदवी, पदविका मध्ये यश मिळवलेल्या गुणवंतांचा
सन्मान करण्यात आला. बालाजी लॉन्स येथे(दि.२४)झालेल्या या कार्यक्रमाला समाजातल्या विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
यश मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाला कवेत घ्या. जागतिकीकरणाच्या युगात शासकीय सेवेत लोकसेवा करण्याची संधी मिळणे म्हणजे एक जीवनाचा एक सन्मान आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य परीट धोबी वरती समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी डी सोनटक्के यांनी केले. यावेळी प्रसिद्ध उदयोजक राजेंद्रशेठ आहेर,मधुकरशेठ आहेर, महासंघच्या महिला अध्यक्ष सौ अरुणा रायपुरे, युवा उद्योजक आनंदशेठ आहेर,युवासेना जिल्हा प्रमुख (उबठा)विक्रम रंधवे,सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज खंडाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक स्वाती पवार,पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ, पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरडकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे,सहाय्य्क पोलीस निरीक्षक अमित गवळी यांच्यासह गुणवंत विध्यार्थी व विशेष प्राविण्य मिळवलेले खेळाडू उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कारमूर्तींचा देखील सत्कार करण्यात आला . यावेळी निशिगंधा रसाळ सहाय्यक कामगार आयुक्त नागपूर,कोमल सावरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, मयुरी शिंदे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमरावती आदिवासी विकास विभाग,प्राची चटप आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या खेळाडू,आर्या शिंदे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू,प्रसाद परदेशी राष्ट्रीय तलवारबाजी प्रशिक्षक,मिताली परदेशी खेलो इंडिया युथ गेम मध्ये सिल्वर मेडल विजेते उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राजेंद्रशेठ आहेर,मधुकरशेठ आहेर व मा आनंदशेठ आहेर यांनी मोलाचे सहकार्य केले*
तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयराम वाघ, मनोज म्हस्के,कैलास देवरे, शेखर परदेशी,योगेश रोकडे, ललित देशावरे,सुरेश परदेशी, योगेश मोगरे,हर्षल परदेशी, कुणाल परदेशी,मयूर महाले, विजय देवरे,प्रवीण पवार जितेंद्र खैरनार,पुरुषोत्तम आगळे, चेतन गायकवाड
आदिनी परिश्रम घेतले.

कार्यक्रम चे सूत्रसंचालन सौ कविता चौधरी,सौ अनुराधा वाघ यांनी केले
प्रस्तावना जयराम वाघ कार्यक्रमाची रूपरेषा मनोज म्हस्के यांनी सांगितली तर
आभार प्रदर्शन योगेश रोकडे यांनी केले.