करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- गणेशोत्सव कालावधी मध्ये डीजे, डॉल्बी सिस्टीम मुळे वयोवृद्ध नागरीक, लहान मुले, गर्भवती महिला यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम तसेच अकाली येणारे बहीरेपण, हृदयविकार आदी बाबींचा विचार करता मंडळानी डीजे डॉल्बी लावू नये अशा सूचना उपविभागीय पोलिस अधीक्षक व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी आयोजित केलेल्या मंडळाच्या बैठकीत केले होते.
त्यानुसार किल्ला विभागातील लोकमान्य टिळक तरुण मंडळाचे अध्यक्ष दिपक सुरवसे व इतर पदाधिकारी यांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचा आदर करीत एडव्हांस देऊन ठरवलेला डीजे रद्द करत बँजो लावलेला असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. तसेच मंडळाच्या वतीने जिवंत देखावा सादर करीत संपूर्ण दहा दिवस विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष दिपक सुरवसे यांनी सांगितले.