अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बेभान! शेतकऱ्यांची चिंता नाहींच हायवेवर धिंगाणा..
अमळनेर : विक्की जाधव
शेतकऱ्यांच्या जीवनाशी थेट निगडीत असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर आज चुकीच्या नेतृत्वाच्या ताब्यात गेली आहे. संचालक मंडळातील काही जण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी हायवेच्या कडेला गाड्या लावून “रोडवर चोरीचा मामला” सारख्या गाण्यांवर नाचत धिंगाणा घालत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
या संदर्भात त्यांच्याच जवळच्या कार्यकर्त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर मार्मिक ला दिली माहिती..
शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणणाऱ्यांना लाजेचे भानही नाही. एका महिन्यापासून बैलजोडीच्या साजाचे दिलेले आश्वासन अद्याप अपूर्ण.राजकीय मंडळी आणि काही पत्रकारांच्या जवळिकीचा आधार घेत शेतकऱ्यांची फसवणूक झाकण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी; बाजार समितीच्या भवितव्याशी होतोय खेळ.

“जमिनीवर शेतकरी हवालदिल… हायवेवर संचालक बेभान!”
कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर ही शेतकऱ्यांची अस्मिता आहे. मात्र अशा बेफिकीर नेतृत्वामुळे शेतकरी वर्गाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. अमळनेरकरांनी आणि शेतकऱ्यांनी वेळीच डोळे उघडले नाहीत, तर या महत्त्वाच्या संस्थेचे भविष्य अंधारात जाणार यात शंका नाही.

शेतकऱ्यांच्या नावाने मते घेणारेच आज शेतकऱ्यांच्या घामाशी बेईमानी करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी हायवेच्या कडेला गाड्या लावून धिंगाणा घालत आहेत.
पुढील वृत्त लवकरच..
प्रतिक्रिया..
बऱ्याच दिवसापासून थांबलेल्या पावसाने पुन्हा आगमन केल्याने आम्हाला आनंद झाला होता. लोक हि नाचत होते, आम्हीही नाचलो. नदी ओढ्यांना पाणी आल्याने शेतकरी हि आनंदीत आहे.