विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – 15 ऑगस्ट 2025 रोजी ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था संचलित इरा किड्स प्ले स्कूल व स्वरूप बालक मंदिर भोईटे नगर दौंड यांच्यावतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी नानवीज पोलीस ट्रेनिंग सेंटर चे पोलीस निरीक्षक मा. नितीन बोधे ,मा.गट शिक्षणाधिकारी बी वाय जगताप सर, दौंड नगरपालिकेचे प्रकल्प अधिकारी दीपक मस्के, शुभम चौकटे,शिवसेना युवा सेनेचे पुणे जिल्हा उपप्रमुख अमोल जगताप ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दौंड शहर कार्याध्यक्ष प्रमोद सावंत, भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा प्रवक्ते प्रा.दिनेश पवार ,भारतीय पत्रकार संघाचे दौंड तालुका अध्यक्ष मा. सुभाष कदम सामाजिक कार्यकर्ते आफताफ सय्यद तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम दाखवण्यात आले मुलांचे भाषणे इ कार्यक्रम घेण्यात आले यासाठी शाळेचे शिक्षक वृंद शिक्षका प्रतिभा शिंदे, शिक्षका शिल्पा कांबळे, शिक्षका भाग्यश्री धावडे व मावशी योगिता कसबे यांचे सहकार्य लाभले तसेच शाळेच्या प्रिन्सिपल सौ वैशाली रणदिवे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव रणदिवे सर यांचेकडून आलेल्या सर्व पालक व प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री धावडे यांनी केले.