भाजपा धुळे जिल्हा (ग्रा)नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी यांना पालकमंत्री ना.जयकुमार रावल साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप तसेच विविध कार्यक्रम संपन्न..
भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा (ग्रा)नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी यांना पालकमंत्री ना.जयकुमार रावल साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप…
*महाराष्ट्राचा लाडका भाऊ देवाभाऊ यांना रक्षाबंधन निमित्ताने धुळे जिल्हा भाजपा महिला मोर्चा तर्फे १ लाख २० वीस हजार राख्या पालकमंत्री ना.जयकुमार रावल साहेब यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
*धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी, मोर्चा आघाड्या जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष यांचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्याचे पणन राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री ना. जयकुमार रावल साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच रक्षाबंधन निमित्ताने महाराष्ट्राचा लाडकाभाऊ देवाभाऊ यांना धुळे जिल्हा भाजपा महिला मोर्चा तर्फे जिल्ह्यातून लाडक्या बहिणीकडून जमा केलेल्या १लाख २० हजार राख्या देवाभाऊंचे विश्वासू सहकारी ना.रावल साहेब यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.यावेळी आ.काशीराम पावरा, आ.राम भदाणे, धुळे जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलाणे, मा.जि.प.अध्यक्ष सुभाष देवरे, भाजपा धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, मा.आ.कुणाल पाटील, मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी,नारायण पाटील,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा रक्षाबंधन कार्यक्रमाच्या संयोजक सौ.धरतीताई निखिल देवरे, मा.कृषी सभापती प्रा.अरविंद जाधव सर ,हर्षवर्धन दहिते, बाळासाहेब भदाणे तसेच जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, विविध मोर्चा,आघाडी अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन फाळणी स्मृति दिवस होता त्याबद्दल माहिती सरचिटणीस डी एस गिरासे सर यांनी सांगितली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलाणे , सूत्रसंचालन सरचिटणीस प्रा. डी.एस गिरासे सर,आभार प्रदर्शन सरचिटणीस भाऊसाहेब देसले यांनी केले.
