भिगवण मध्ये होणार एकाच दिवशी होणार सहा दहीहंडी तर मदनवाडी येथे होणार दोन दहीहंडी पहा सविस्तर कोणती दहीहंडी, कोणत्या दिवशी? कोण आयोजक?..
भिगवण परिसरात 8 दहीहंडीचे आयोजन
(निलेश गायकवाड)
दहीहंडी महोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते डीजे, लाईटचा शो, सेलिब्रिटी, आमदार खासदार, दहीहंडी फोडणारे पथक, कार्यकर्ते, तसेच कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले नागरिक चाहते यामुळे परिसरात तुडुंब गर्दीचे रूप धारण होते. असेच आता भिगवण परिसरामध्ये तब्बल सात दहीहंड्या होणार आहेत. यामध्ये भिगवण येथे सहा तर मदनवाडी येथे दोन दहीहंडी महोत्सवाच्या आयोजन असणार आहे. भिगवन मधील सहा दहीहंडी व मदनवाडी येथील दोन दहीहंडी याची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे….
1) राष्ट्रवादी चषक रोहित शेलार मित्रपरिवार च्या वतीने आयोजन
दि.18 ऑगस्ट 2025 (मार्मिक समाचार )

आयोजकांचे नाव – रोहित शेलार मित्रपरिवार
प्रमुख आकर्षण त्यांचे नाव – अक्षता पुणेकर जुई शेरकर पूजा कदम सुहानी पुणेकर तनुश्री पुणेकर ऋतिका पुणेकर नर्गिस पुणेकर
प्रमुख पाहुणे नावे -कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर
स्थळ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मेन पेठ वार्ड 1
वेळ दिनांक -18 ऑगस्ट 2025 सोमवारी साय 6
2 ) श्रीनाथ तरुण मंडळ भिगवण (मार्मिक समाचार )

आयोजकांचे नाव – श्रीनाथ तरुण मंडळ भिगवण
प्रमुख आकर्षण त्यांचे नाव – शिवकन्या तोडकर
प्रमुख पाहुणे नावे – कृषिमंत्री मा.श्री.दत्तात्रय भरणे, आमदार श्री राहुल कुल, मा श्री सचिन सातव, मा श्री अभि काका देवकाते पाटील, मा श्री तानाजी जाधव, मा श्री सचिन घुले, मा श्री शंभूराजे जगताप, मा श्री अनिकेत घुले
स्थळ – छत्रपती शिवाजी महाराज चौक भिगवण
वेळ दिनांक – सायंकाळी ५ वा
3 ) भिगवण युवा प्रतिष्ठान &ssp ग्रुप भिगवण (मार्मिक समाचार )

आयोजकांचे नाव – बंटी भोसले &प्रेम dada भोसले &प्रेम लोंढे &संघर्ष धेंडे &नितीन थोरात & साहिल माकरे
प्रमुख आकर्षण त्यांचे नाव – इंटरनॅशनल फेमस फॉरेनर आर्टिस्ट& संजोरी बाविस्कर & स्नेहल पवार सिने अभिनेत्री
आणि स्वारसंगम ऑर्केस्ट्रा
प्रमुख पाहुणे नावे -कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
स्थळ – दुर्गा माता मंदिर मेन पेठ भिगवण
वेळ दिनांक -18/8/2025 वेळ 7 वाजता
4 )दुनियादारी ग्रुप

आयोजकांचे नाव – राहुल ढोले, इंदर कांबळे, नामदेव भोसले, किरण मोरे
प्रमुख आकर्षण त्यांचे नाव – मानसी पुणेकर
प्रमुख पाहुणे नावे – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राहुल कुल
स्थळ – भोसले कोम्पलेक्स मेन पेठ
वेळ दिनांक – 18 ऑगस्ट 2025 वेळ 6
5) श्रीराम चषक दहीहंडी मोहोत्सव

आयोजकांचे नाव – अनिकेत जमदाडे, करन थोरात
प्रमुख आकर्षण – लाईट शो & साउंड
प्रमुख पाहुणे नावे – राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर
स्थळ : श्री गणेश चौक, वार्ड क्र 3
वेळ -18 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वा.
6)सिद्धार्थ ग्रुप

आयोजक – संदीप वाघमारे , राजाभाऊ जाधव, सुनील जाधव, रमेश कदम.
प्रमुख आकर्षण – शुभांजली थोरात, व 7 नृत्यांगना
प्रमुख पाहुणे – कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, शिरूचे आमदार माऊली आबा, सर्जेराव भाऊ वाघमारे कोरेगाव भिमा रणवीजय स्तंभ संस्थापक अध्यक्ष सर्जेराव भाऊ वाघमारे, प्रसिद्ध उद्योजक स्वप्नील शेठ हरगुडे वाघोली. स्थळ – मेनपेठ सिद्धार्थ चौक भिगवण
वेळ – 18-रोजी संध्याकाळी ठीक 7 वाजता
मदनवाडी गावातील दोन्ही दहीहंडी दि. 21 ऑगस्ट रोजी खालीलप्रमाणे 👇
1) समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान ची दहीहंडी गुरुवारी 21 ऑगस्ट 2025 (मार्मिक समाचार )

आयोजकांचे नाव – कुंडलिक बंडगर,तेजस दादा देवकाते
प्रमुख आकर्षण त्यांचे नाव – सिनेअभिनेता देवेंद्र गायकवाड (मुळशी पॅटर्न ) राधा पाटील मुंबईकर( लावणी सम्राटनी)
प्रमुख पाहुणे नावे – विधानपरिषद सभापती राम शिंदे,कृषिमंत्री दत्तात्रय भरणे,आमदार राहुल कुल, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आदिजन
स्थळ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक मदनवाडी
2 ) जय हनुमान दहीहंडी उत्सव मदनवाडी (मार्मिक समाचार )

आयोजकांचे नाव – स्वप्निल बंडगर मित्रपरिवार
प्रमुख आकर्षण त्यांचे नाव – सायली पाटील
प्रमुख पाहुणे नावे -कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
स्थळ – दत्त मंदिर राशीन रोड
वेळ दिनांक -21 ऑगस्ट 2025
अशाप्रकारे भिगवन व परिसरातील दहीहंडी याचे आयोजन करण्यात आल्यामुळे 18 व 21 तारखेला भिगवन व मदनवाडी येथे सर्व मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळणार आहे.