भिगवणला विविध वस्तूंचे ५० टक्के सवलतीच्या दरात वाटपाचे आयोजन
(निलेश गायकवाड)
भिगवण ता.१६,(वार्ताहर)
स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील मा. सरपंच दिपीका क्षीरसागर यांच्या विशेष सहकार्यातून महिला सबलीकरण अंतर्गत विविध प्रकारच्या वस्तूंचे ५० टक्के सवलतीच्या दरात वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ नुकताच संपन्न झाला. भिगवण आणि परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार असून,या वस्तूमध्ये प्रामुख्याने शिलाई मशीन, पिठाची गिरणी, इलेक्ट्रॉनिक शेगडी,मिक्सर, सायकल,शेती पंप,टीव्ही,टॉवर फॅन अशा विविध वस्तू सवलतीच्या दरामध्ये वाटप करण्यात येणार आहेत.या वस्तू बुकिंग करण्याची मुदत १५ ते २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत असणार आहे या कालावधीत इच्छुकांना सवलतीच्या दरात वस्तू मिळणार आहेत. विशेषतः महिलांचे सबलीकरण करून त्यांचे सक्षमीकरण करणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे.
यावेळी अशोक शिंदे,प्रकाश ढवळे,हनुमंत बंडगर,अजित क्षीरसागर,रमेश धवडे, दादासाहेब थोरात,अशोक काटे, रियाज शेख,सीमा काळंगे, यांनी मनोगत व्यक्त करत सदर उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी अजिंक्य माडगे,तुकाराम बंडगर,यशवंत वाघ,जावेद शेख,संदीप वाकसे,सुरेश बिबे,नितीन चितळकर,नानासाहेब बंडगर, डॉ.काशिनाथ सोनलकर, माऊली मारकड,ऍड.सुरज खटके,आकाश उंडाळे,प्रसाद क्षीरसागर,विशाल पाचंगणे, निखिल बोगावत,संजय खाडे, संतोष सवाने,विशाल खडके,राजू गाडे,धनंजय थोरात,स्वप्निल बंडगर,पिंटू शेलार,आकाश पवार,संतोष सोनवणे सुनील धवडे,संजय भरणे,केशव भापकर,लहुजी घोलप,आकाश देहाडे, कपिल लांडगे,दिपीका क्षीरसागर,अमृता गायकवाड सपना शिंदे,अश्विनी बंडगर,मेघा शेलार,रेखा क्षीरसागर,अस्मिता क्षीरसागर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा.तुषार क्षीरसागर व आप्पासाहेब गायकवाड यांनी केले.
शिलाई मशीन,पिठाची गिरणी या वस्तूंच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि त्यातून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी या उपक्रमाची मदत निश्चित पणे होईल.
—-दिपीका क्षीरसागर,मा. सरपंच भिगवण