बारामती आगार या युनिटच्या नामफलकाचे अनावरण;15 ऑगस्ट रोजी कामगारांनी जल्लोषात केले अनावरण

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामती आगार या युनिटच्या नामफलकाचे अनावरण;15 ऑगस्ट रोजी कामगारांनी जल्लोषात केले अनावरण

(निलेश गायकवाड)

15 ऑगस्ट रोजी बारामती आगारात, स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर एस टी कामगार संघटना, बारामती आगार या युनिटच्या नामफलकाचे अनावरण, एस.टी.* कामगार संघटनेचे, सरचिटणीस, कर्मयोगी मा. श्री हनुमंतरावजी ताटे
यांच्या शुभहस्ते,करण्यात आले,

याप्रसंगी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कामगार संघटनेचा विजय असो!
ताटे साहेब तुम आगे बडो
हम तुम्हारे साथ है
संदीप भाऊ तुम आगे बडो
हम तुम्हारे साथ हे!
या घोषणांनी बारामती आगार आणि बारामती बस स्थानकाचा परिसर दुमदुमून गेला
याप्रसंगी आगारातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते, तसेच आगार कार्यकारिणी सदस्य, संघटनेचे आजी माजी पदाधिकारी आणि एम.आय. डी. शी. आगाराचे आणि वि.का.शा. बारामती युनिट चे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते,
मा.ताटे साहेब यांच्या शुभ हस्ते नामफलकाचे अनावरण झाल्यानंतर, फटाके फोडून आणि पेढे वाटून हा आनंदउत्सव साजरा करण्यात आला,
युनिट चे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे आयोजक श्री श्रीनाथ शेलार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मनोगत व्यक्त केले, तसेच
उपस्थित कर्मचाऱ्यांना मा. ताटे साहेब यांनी मार्गदर्शन केलं तसेच कर्मचाऱ्यांच्या थकबाकी संदर्भात, एस टी कामगार संघटना, आक्रमक भुमिका घेणार असुन, सर्वांनी लढ्याची तयारी ठेवावी, असे हि कर्मचाऱ्यांना मा. ताटे साहेब यांच्या कडुन आवाहन करण्यात आले,
उपस्थित कर्मचाऱ्यांचे, कार्यक्रमाचे आयोजक, युनिट चे सचिव श्री दादासाहेब साळवे, यांनी आभार मानले, आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
याप्रसंगी सोसायटी चे माजी संचालक श्री शाहिद सय्यद, एम.आय. डी. शी.आगाराचे सचिव श्री सचिन लोणकर, विभागीय कार्यशाळा बारामती चे अध्यक्ष श्री सोमनाथ गायकवाड, संघटनेचे खजिनदार, श्री विकास सावंत,कार्याध्यक्ष श्री सोनबा वाडकर, उपाध्यक्ष श्री विकास भोसले,श्रीकांत काळे, प्रमुख कारागीर श्री काळे, श्री संतोष गिरमे, श्री अन्सार शेख, श्री अमर पठाण हे उपस्थित होते

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!