शेळावे ढगफुटीग्रस्तांची पाहणी करताना माजी आमदार शिरीषदादा चौधरी – जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असणारा मा. आमदार
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील शेळावे येथे झालेल्या ढगफुटीमुळे आदिवासी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी शेतकऱ्यांचे खरे कैवारी म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार शिरीषदादा चौधरी गावात दाखल झाले. पाहणीदरम्यान सरपंच, दोन्ही गावांचे पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांचे हाल जाणून घेत दादांनी प्रशासनाकडे तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

15 _ 15 वर्षे राज्य करणारे अनेक माजी आमदार निवडणुकीनंतर जनतेपासून दूर राहतात. मात्र शिरीषदादा यांनी माजी आमदार असूनही लोकांच्या समस्या सोडवणे, दुःखात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे हेच आपले ध्येय ठेवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शेळावेतील पाहणी दौऱ्याने शिरीषदादा चौधरी यांचे जनतेशी असलेले नाते हे राजकारणापलीकडे जाऊन लोकाभिमुख सेवाभावाचे आहेत असे लोक बोलू लागले आहेत, त्यामुळेच आजही ते जनतेच्या मनात ठाम स्थान मिळवून आहेत.
