श्री मंगळ ग्रह मंदिरात श्री तानाजी महाराजांचा रिंगण सोहळा संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्री मंगळ ग्रह मंदिरात श्री तानाजी महाराजांचा रिंगण सोहळा संपन्न..

 

अमळनेर : विक्की जाधव

भारतातील अतिप्राचीन, अतिदुर्मिळ आणि अतिजागृत देवस्थान म्हणून एकमेव असलेलं श्री मंगळ ग्रह मंदिर या ठिकाणी श्री संत तानाजी महाराज यांच्या चरण पादुकांचे फिरस्ती दरम्यान आगमन झाले. श्री संत तानाजी महाराज यांचे मुळगाव विटनेर श्री संत तानाजी महाराज यांची समाधी अमळनेर पहिलाड या ठिकाणी आहे. तानाजी महाराजांच्या पादुका चारही दिशांना नेल्या जातात.

पूर्वेला बुऱ्हानपूर पर्यंत पश्चिमेला गुजरात अंकलेश्वर पर्यंत उत्तरेला वृंदावन पर्यंत तर चौथ्या वर्षी दक्षिणेकडे मुंबईपर्यंत नेत असून श्री संत तानाजी महाराजांच्या समाधी सोहळ्याला ८७ वर्ष पूर्ण होत असून हा ८७ वा समाधी सोहळा आणि मुंबई फिरस्ती दौरा दरम्यान मुक्काम अमळनेर या ठिकाणी आहे. फिरस्ती दौऱ्यात श्री संत तानाजी महाराज यांचा चरणपादुकांचे आगमन सोमवार दि ११ रोजी सायंकाळी ५:०० वाजता श्री मंगळ ग्रह मंदिरात झाले चरण पादुकांचे स्वागत करण्यात आले. चरणपादुकांचे पूजन करून रिंगण सोहळा या ठिकाणी आनंदात भक्तीमय उत्साहात सोहळा संपन्न झाला. या ठिकाणी श्री संत तानाजी महाराज रिंगण सोहळ्याचा सन्मान श्री मंगळ सेवा संस्थांच्या वतीने करण्यात आला यावेळी श्री मंगळ ग्रह सेवा संस्थांचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव गिरीश कुलकर्णी, अधीक्षक भरत पाटील सेवेकऱ्यांसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!