बारामतीत पत्रकाराला धमकी दिल्या प्रकरणी अनेक पत्रकार संघटना आक्रमक
बारामती विभागातील पोलीस प्रशासनाला निवेदन.!
बारामती (सह संपादक – संदिप आढाव )
.
बारामती मधील पत्रकार नेहमीच आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या समस्यांबाबत त्यामध्ये भ्रष्टाचाराच्या घटना असतील, गरिबांच्या अडीअडचणी बाबत आपल्या वृत्तपत्रात बातम्या लिहीत असतात. सध्या स्थिती होणारे अन्याय अत्याचाराबाबत नेहमीच ते अग्रेसर होऊन निर्भीड आणि निपक्षपाती बातम्या लिहीत असतात मात्र त्यांना कोणाच्या ना कोणाच्या धमक्यांना सामोरे जावे लागते असाच प्रकार बारामतीतील एका पत्रकाराबरोबर घडला असून संबंधित रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराने “माझी बातमी का लावली,, याचा राग मनात धरून फोन द्वारे पत्रकाराला धमकी दिली आहे. बारामती मध्ये हा असा प्रकार घडले म्हणजे पोलीस प्रशासनाच्या कार्याला केराची टोपली दाखविल्यासारखा आहे.पत्रकारांवरच गदा येत असेल तर पोलीस प्रशासनाने संबंधित प्रकरणाबाबत सखोल चौकशी करून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास प्रस्ताव पाठवून एनपीडीअंतर्गत करावी करणे अपेक्षित आहे. परंतु असे होताना दिसत नाही.त्यामुळे बारामतीतील सबंध पत्रकार एकत्र येऊन त्यांनी प्रांत अधिकारी बारामती विभाग तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन दिली आहेत या मध्ये ऑल इंडिया संपादक पत्रकार संघ,पुणे जिल्हा पत्रकार संघ,संपादक पत्रकार संघ बारामती, अशा महाराष्ट्रातील विविध संघटना एक वचले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रभर निषेध व्यक्त करून संबंधित रेकॉर्डवरील गुन्हेगाराला कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.सडेतोड लेखणीतून न्याय मिळवून देणाऱ्या आणि अन्याय अत्याचाराविरोधात छापलेल्या बातम्या जनतेसमोर आणणाऱ्या या देशाच्या चौथ्या स्तंभास म्हणजेच पत्रकारास न्याय द्यावा आणि पुढील काळात जर असे प्रकार घडले तर तात्काळ पोलीस प्रशासनाने धमक्या देणाऱ्या किंवा पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींस अजामीन पात्र आणि दखलपात्र गुन्हे दाखल करावेत असे संघटनांकडून निवेदनामध्ये मागण्या करण्यात आलेले आहेत. त्यामुळे यापुढे पत्रकारांवर हल्ले करणारे किंवा त्यांना धमक्या देणाऱ्यांची खैर केली जाणार नाही त्यांना आम्ही कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ असे देखील संबंध पत्रकार बांधवांनी निवेदन देत असताना अधिकाऱ्यांना सांगितले आहे.