खानदेशात उत्सवाची रेलचेल: कानबाई मातेच्या भक्तीत रंगले संपूर्ण खांदेश

अपनी भाषा में पढ़े! Translate

खानदेशात उत्सवाची रेलचेल: कानबाई मातेच्या भक्तीत रंगले संपूर्ण खांदेश

 

अमळनेर : विक्की जाधव 

खानदेशचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेचा उत्सव संपूर्ण खांदेशात आज (रविवार) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. घराघरात श्रद्धेने व भक्तिभावाने पूजन होऊन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जात आहे. शनिवारी रात्रीच पारंपरिक भाजी-भाकरीचा ‘रोट’ करण्याची परंपरा पाळली गेली असून, अनेक ठिकाणी भाविकांनी जागरण करत भक्तिरसात रंगलेली रात्र अनुभवली. भाविकांच्या घरोघरी कानबाई मातेचं पूजन, गीतगायन, पारंपरिक गोंधळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेलं आहे. आज रविवारी खास पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर सोमवारी मिरवणुकीद्वारे कानबाई मातेचा उत्सवाचा समारोप केला जाणार आहे. बँड, ढोल-ताशा आणि डीजेच्या तालावर नाचत, जल्लोषात भक्तगण आपली लाडकी देवी “कानबाई मातेचा जयघोष” करीत निरोप देतील.

खानदेशातील या परंपरेतून भक्ती, एकोप्याची भावना आणि सांस्कृतिक जपणूक यांचे सुंदर दर्शन घडते.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!