अमळनेर तालुक्यात विविध शिवरस्त्यांवर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर तालुक्यात विविध शिवरस्त्यांवर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम..

 

अमळनेर : विक्की जाधव 

अमळनेर तालुक्यातील म्हसले–जुनोने, पिंपळे बु.–चिमणपुरी व नांदेड फाटा–धावडे या प्रमुख शिवरस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला. या उपक्रमाचा शुभारंभ अमळनेरचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या हस्ते करण्यात आला. गाव पाणद रस्त्यावर विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले असून ग्रामपंचायत व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.

स्थानिक नागरिक, विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या वृक्षारोपणामुळे रस्त्यालगत हरित पट्टा तयार होऊन पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार असल्याचे मत तहसीलदार सुराणा यांनी व्यक्त केले.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!